क्राइमनांदेड जिल्हामराठवाडाहिमायतनगर

अनैतिक संबंधासाठी वयस्क महिलेशी लागला होता लळा…खून करण्यासाठी त्याने दाबला तिचा गळा

हिमायतनगर पोलीसांनी ६ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघड करुन 'त्या' आरोपीस केले अटक

अंबुज प्रहार प्रतिनिधी
हिमायतनगर : तालुक्यातील मौ.दुधड येथील एका ५० वर्षीय महिलेशी गावातीलच एका ३० वर्षीय तरुणाचे सूत जुळले होते.अनैतिक संबंधाच्या लालसेने एका रात्री तो तिच्या घरी गेला असता तिने पळून जाऊन दुसरे घर करून राहुयात म्हणून तगादा लावला.यामुळे राग अनावर झालेल्या त्या तरुणाने तिचा गळा दाबून खून केला. ‘अनैतिक संबंधासाठी वयस्क महिलेशी लागला होता लळा, परंतू खून करण्यासाठी त्याने दाबला तिचा गळा’. अनैतिक शरीर सुखाची लागली होती चटक,परंतू खून केल्याने व्हावे लागले त्याला अटक.सदरील गुन्ह्यात प्रथम दर्शनी आत्महत्या केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला असला तरी हिमायतनगर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या ६ तासांच्या आत खूनाचा गुन्हा उघडकीस आणला असून ‘त्या’ आरोपीस अटक ही केली आहे.या उत्कृट तथा यशस्वी कामगीरीमुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिमायतनगर पोलीसांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

सविस्तर असे की,मोतीराम धोंडीबा शिंदे(वय ४३ वर्षे) रा. दुधड ता.हिमायतनगर जि.नांदेड यांनी दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्यात येऊन अन्नपूर्णा कोंडबाराव शिंदे(वय ५० वर्षे) रा.दुधड या महिलेचा दि.८ सप्टेंबर रोजी च्या रात्री ८:०० ते दि.९ सप्टेंबर रोजी च्या पहाटे(मध्यरात्री) ००:३० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन खुन केला आहे अशी तक्रार दिली.यावरुन हिमायतनगर पोलीसांत गुरनं २०८/ २०२५ कलम १०३(१), बीएनएस कायदा प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार(आयपीएस),भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके, अर्धापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनीअल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे,पो.उप.नि.अजीमोद्दीन शेख, जमादार शंकर नलबे, नामदेव जाधव,बालाजी पाटील,श्याम नागरगोजे,विजय कलाले,पो.कॉ.चंद्रकांत आरकिलवार, ज्ञानेश्वर झिंकलवाड व सायबर सेलचे जमादार राजेंद्र सिटीकर यांचा समावेश असलेले पोलीस पथक तपासचक्र गतीमान केले.
याच दरम्यान सदरील पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की,उपरोक्त मयत महिलेसोबत सुनिल भारत हातमोडे(वय ३० वर्षे)रा.दुधड ता.हिमायतनगर या तरुणाचे अनैतीक संबध होते.ही माहिती प्राप्त होताच सदरील पोलीस पथक तात्काळ मौ.दुधड येथे गेले व त्या संशयीत तरुणास ताब्यात घेतले.पोलीस ठाणे हिमायतनगर येथे आणून विश्वासात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सांगीतले की,गेल्या एक वर्षापासून त्या महिलेसोबत त्याचे अनैतिक संबध होते. याच अनुषंगाने दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे(रात्री) ००:३० वाजताच्या दरम्यान त्या महिलेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता.यावेळी सदरील महिलेने आपण गाव सोडून दुसरीकडे जाऊन एकत्र राहूयात म्हणून त्याला तगादा लावला.यामुळे त्याचा राग अनावर झाला व रागाच्या भरात त्याने त्या महिलेचा गळा दाबुन तिचा खून केला आहे.प्रथम दर्शनी ती आत्महत्या असल्याचे दर्शविण्याचा त्याने प्रयत्न केला.परंतू हिमायतनगर पोलीसांनी केलेल्या चौकशी दरम्यान उपरोक्त आशयाप्रमाणे जबाब दिल्यावरुन त्यानेच तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.सदरील वयस्क महिलेसोबत असलेले या तरुणाचे अनैतिक संबंध शेवटच्या टोकाला गेल्याने हा खूनाचा गंभीर गुन्हा घडल्याची बाब अवघ्या ६ तासांच्या आत हिमायतनगर पोलीसांच्या या पथकाने उघडकीस आणली व आरोपीस ही अटक केली आहे.पोलीस पथकाची ही उत्कृट तथा अभिनंदनीय कामगीरी असल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्या सर्वांचे कौतुक केले असून पो.नि.अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close