आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाशेत शिवार

रेणापूर सुथा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मावेजा मागणीला आले तात्पुरते यश…

कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड यांनी दिलेल्या लेखी आश्वासने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण मागे ; तर आश्वासित मुद्दतीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने उत्तम बाबळे यांनी दिला आहे.

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील रेणापूर सुधा बृ.ल.पा.तलाव प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या कामासाठी ६ गावच्या शेतकऱ्यांची ३७.०७ हेक्टर अतिरिक्त जमिन भुसंपादित करण्यात आली.मुल्यमापनानुसर निश्चित केलेली एकूण रक्कम न देता सदरील भुसंपादित जमिन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ७/१२ वरुन कमी करण्यात आली.परंतू अद्यापही उर्वरित ७० टक्के प्रलंबित मावेजाची रक्कम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता व पुल ही बांधून देण्यात आला नाही.त्यामुळे प्रलंबित एकूण मावेजा त्वरीत द्यावा व रस्ता आणि पुल बांधून द्यावा यांसह आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरयांनी दि.१८ मे २०२६ रोजी पासून भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले होते.रखरखत्या उन्हातील या उपोषणाची दखल घेऊन विष्णूपुरी प्रकल्प विभाग क्रं.-२,जि.नांदेड चे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या दि.१० जून २०२६ पर्यंत पुर्ण करु,असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषणाची सांगता केली.तसेच आश्वासित मुद्दतीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने उत्तम बाबळे यांनी दिला आहे.
रेणापूर सुधा बृ.ल.पा.तलाव प्रकल्प ता.भोकर ची १.१० मीटर उंची वाढवण्यासाठी मौ.बोरगाव,किन्हाळा, थेरबन, बटाळा,रेणापूर व सोमठाण या एकूण ६ गावच्या शेतकऱ्यांची ३७.०७ हेक्टर अतिरिक्त जमिन भुसंपादीत करण्यात आली.सदरील भुसंपादित जमिनीची मुल्यमापन मावेजा रक्कम २३ कोटी ३४ लाख रुपये निश्चित करण्यात आली.परंतू ही रक्कम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न देता उंची वाढविण्याचे काम मार्च २०२५ मध्ये सुरु करण्यात आले. यावेळी भुसंपादित जमिनीचा मावेजा प्रथम देण्यात यावा व नंतर काम सुरु करावे असा पावित्रा घेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले होते. तसेच आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी दि.९ जून २०२६ रोजी भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या कार्यालयासमोर कार्यकारी अभियंता,विष्णूपुरी प्रकल्प विभाग क्रं.-२,जि.नांदेड यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्तम बाबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरु केले होते.यावेळी एकूण मावेजापैकी ३० टक्के रक्कम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्याबाबत तत्कालीन कार्यकारी अभियंता प्र.र.मुदगल यांनी आश्वासित केले होते व जुलै २०२५ मध्ये ठरल्याप्रमाणे मावेजाची ७ कोटी ९७ लाख रुपये अर्थातच ३० टक्के रक्कम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली.
मावेजाची ३० टक्के रक्कम देऊन जवळपास १० महिने होत आहेत.दरम्यानच्या काळात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उर्वरित प्रलंबित ७० टक्के मावेजाची एकूण १५ कोटी ३७ लाख रुपये रक्कम मिळावी यासाठी भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर,कार्यकारी अभियंता, विष्णूपुरी प्रकल्प विभाग क्रं.-२,जि.नांदेड यांच्याकडे सातत्याने लेखी व तोंडी मागणी केली होती.मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रलंबित मावेजाविषयी १४ कोटी ३८ लक्ष रुपयांची तरतुद केली होती.परंतू सदरील मागणीस संबंधित अधिकारी व पाटबंधारे विभाग प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला.तसेच सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले व प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्तम बाबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि.१८ मे २०२६ रोजी पासून भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात अमरण उपोषण सुरु केले.सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक उपोषणकर्ते म्हणून नईमोद्दीन हमीदमिया शेख,बालाजी गणपत वनलवाड,प्रशांत श्रीराम शिवेवार,शंकर दत्ता नवटक्के,मोहमद रेहान अब्दुल अजीज कुरेशी यांसह आदींनी अमरण उपोषणात समावेश होता.
याची दखल घेऊन अभियंता,विष्णूपुरी प्रकल्प विभाग क्रं.-२,जि.नांदेड चे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड यांनी कार्यकारी संचालक,गोदावरी मराठावाडा पाटबंधारे विकास महामंडळ,छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे उर्वरीत १५.३७ कोटी रुपये निधी तात्काळ मिळावा असे मागणीपत्र पाठविले.तसेच अधिक्षक अभियंता व सर्व संबंधितांना याविषयीची माहिती अवगत करुन दि.१९ मे २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता भोकर येथील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अभियंता अरुण किशनराव कलवले व सहाय्यक अभियंता श्रेणी -२-कृष्णा नामदेव राजकुंठवार यांची उपस्थिती होती.तर कायदा सुव्यवस्था सांभाळत शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे पो.नि.अजित कुंभार,पो.उप.नि. राम कराड, गोपनीय शाखेचे पो.ना.परमेश्वर गाडेकर,पो.ना. डी.जी.पवळे यांसह आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड यांनी उपरोक्त सर्व मागण्यांविषयी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व दि.१० जून २०२६ पर्यंत सर्व मागण्या पूर्ण करु असे लेखी आश्वासन दिले.आश्वासनपत्र उत्तम बाबळे यांना देण्यात आले व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना रस देण्यात आला.यानंतर उत्तम बाबळे यांनी हे उपोषण यशस्वी करण्यासाठी संबंधित अधिकारी, सर्व उपोषणकर्ते व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांसह ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले आणि उपोषणाची सांगता करण्यात आली.तर प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्तम बाबळे यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा करण्यात आलेले हे अमरण उपोषण यशस्वी करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी तानाजी शिवेवार,शंकर दत्ता नवटक्के,शेख नईमोद्दीन हमिदमियां,गोदावरीबाई नाईकवाडे,दत्ता नवटक्के,गणपत चिल्लेवार,प्रशांत शिवेवार, अ.रहिम अ.करीम,माधव देवकर,दिलीप सुर्यवंशी,शिवाजी हुबेवाड,समीउल्ला बेग अ.बेग,बालाजी वनलवाड,सुरेश आरकलवाड,नारायण आरकलवाड,साई पाटील गौड,संजय मुरगुलवार,मिर्झा तय्यब बेग,दत्ता देशमुख यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close