आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(अजित पवार)भोकर तालुकाध्यक्षपदी माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड

तर भोकर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांची नियुक्ती

तसेच नांदेड उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेश्वर कदम देशमुख यांची नियुक्ती

नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी जिल्ह्यातील विस्तारीत कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या घोषित

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे(अजित पवार)
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी उत्तर जिल्हा कार्यकारिणीच्या विस्तारासह तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या घोषित केल्या असून त्यात ६ जिल्हा उपाध्यक्ष,३ जिल्हा सरचिटणीस,१ विशेष निमंत्रित सदस्य,१ जिल्हा सचिव,७ जिल्हा संघटन सचिव,३ विधानसभा अध्यक्ष, ७ तालुकाध्यक्ष,७ शहराध्यक्ष,१ कार्यालयीन सचिव अशा प्रकारे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नांदेड उत्तर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व कार्यकारिणीचा विस्तार प्रलंबित होता.याबाबद वरीष्ठाच्या सुचनेनुसार व आदेश मान्यतेने त्या नवनियुक्त्या आणि विस्तारिकरण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी नुकत्याच घोषित केल्या असून ते पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.जिल्हा उपाध्यक्ष- राजेश्वर कदम देशमुख,बाबुराव हेंद्रे,अमोल कदम,संजय सिड्डम,अमित राठोड,आनंदराव टिपरशे,जिल्हा सरचिटणीस – गणेश बोल्लेवार,दसराव पुय्याड,केशव पाटील,विशेष निमंत्रित सदस्य- नागनाथ घिसेवाड,जिल्हा सचिव – नागोराव शेंडगे,संघटन सचिव- विकास नाईक,शशिकांत क्षीरसागर,महिमोद्दीन पटेल,आनंद डांगे,सिद्धेश्वर ढवळे, दिगंबर लोळपवाड,भगवान नाईक,विधानसभा अध्यक्ष- शिवाजी आनंदराव कदम (भोकर),वैजनाथ करपूडे (किनवट)एकनाथ जाधव (हदगाव),तर तालुकाध्यक्ष- सुरेश गंगाधरराव बिल्लेवाड (भोकर),आत्माराम कपाटे (अर्धापूर) ,नटुरे हणमंतराव (मुदखेड),निळकंठ कल्याणकर(हदगाव), वामनराव मीराशे(हिमायतनगर),विजय राठोड(माहूर), रामदास पवार(किनवट),तसेच शहराध्यक्ष- शेख जवाजोद्दीन बरबडेकर(भोकर),शेख साबेर शेख सगीर (अर्धापूर),म.साजिद म.रफिक शेख(मुदखेड),शेख जावेद शेख मैनुद्दीन(हदगाव),अमोल माधवराव धुमाळे (हिमायतनगर),अब्दुला अली चाऊस( किनवट),सय्यद सईद अली सय्यद पिरपाशा(माहूर),याच बरोबर कार्यकारणी सदस्य म्हणून गोविंद वाघमारे,युसूफ खान, मोहम्मद बुऱ्हाण,आशिष कल्याणे,संतोष अग्रवाल यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी आमदार मोहन हंबर्डे,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदार सुभाष साबणे,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर,दिव्यांग सेलचे राज्य कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर,वसंत सुगावे,माधव पावडे,श्रीकांत पाटील किन्हाळकर यांसह आदींनी स्वागत केले असून पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भोकर तालुकाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड…
शांत,संयमी,अभ्यासू व कृषि तज्ञ आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेले व्यक्तीमत म्हणून सर्वत्र परिचित असलेले नाव म्हणजेच सुरेश बिल्लेवाड.गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर राजकारण कमी व समाज सेवा अधिक करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.यामुळेच जनतेने पंचायत समितीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले असतांना ही भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले. नव्हे तर त्या सभागृहाचा अभ्यास असल्याने व जनतेच्या समस्यांची जाण असल्याने त्यांना भोकर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली गेली.या पदाचा योग्य वापर करून तालुक्यातील जनतेचे व कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत.अशा बहुआयामी व्यक्तीमत्वास आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.दांडगा जनसंपर्क,ग्रामीण समस्यांची जाण असलेल्या सुरेश बिल्लेवाड यांना हे पद बहाल केल्यामुळे पक्ष बळकटीस संधी मिळणार आहे.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही नक्कीच फायदा होणार आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांत नवचैतन्याचे वातावरण पसरले असून अनेकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.तसेच तालुकाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड यांनी ही नियुक्ती केल्याबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून सर्वांना विश्वासात घेऊन पुढील पक्षकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

भोकर शहराध्यक्ष – शेख जवाजोद्दीन बरबडेकर
भोकर नगर परिषद स्थापनेत मोठा वाटा असलेले व्यक्तीमत म्हणजेच माजी पंचायत समिती सदस्य,सुसंस्कारीत,उच्च शिक्षित मुस्लीम कुटूंबातील सर्वधर्मिय प्रेमी सेवाभावी सेवाभावी व्यक्तीमत म्हणजेच शेख जवाजोद्दीन बरबडेकर होत.कुटूंबात कसलाही राजकीय वारसा किंवा वरदहस्त नसतांनाही केवळ अभ्यास,उच्च शिक्षण व सेवाभावातून राजकीय पटलावर आपले अस्तित्व शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांनी निर्माण केले आहे.माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे भोकर विधानसभा मतदारसंघात आगमन होण्यापूर्वी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची येथे असलीही शक्ती नसतांना भोकर पंचायत समितीच्या सभागृहात सदस्य म्हणून त्यांनी प्रवेश केला.या पदावरुन जनसेवा करत असतांना तसेच सदस्य पदाचा दीड वर्ष कार्यकाळ शिल्लक असतांना त्यांना राजिनामा द्यावा लागला. कारण भोकर विधानसभा मतदारसंघात नव्याने आलेल्या खा.अशोक चव्हाण यांना भोकर नगर परिषद मंजूर करून घ्यायची होती व यासाठी भोकर ग्रामपंचायत आणि भोकर पंचायत समिती सदस्यत्व बरखास्त करणे गरजेचे होते.यावेळी सन २००८-९ मध्ये सरपंच असलेले व भोकर पंचायत समितीचे माजी सभापती नारायण बाबागौड पाटील यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा ठराव घेतला.तसेच शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांनी देखील सदस्यपद त्यागले. त्यावेळी या दोघांनी हा निर्णय घेतला नसता तर भोकर नगर परिषद स्थापन होऊच शकली नसती.सन २०१० मध्ये त्यांनी भोकर नगर परिषदेची निवडणूक लढली व नगरसेवक म्हणून बहुमतांनी ते निवडून आले.ग्रामीण व शहरी भागातील समस्यांची जाण असलेल्या शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांना भोकर नगर परिषदेच्या आगामी निडणूकीपुर्वी भोकर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.याच नव्हे तर यापेक्षा ही मोठ्या पदाची जबाबदारी पार पाडू शकणारे हे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या अनुभवी रणनितीचा होणाऱ्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे.त्यामुळे त्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.तसेच तालुकाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड यांनी ही नियुक्ती केल्याबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून सर्वांना विश्वासात घेऊन पुढील पक्षकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मला कोणतेही पद नको,पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेल – जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख…
एक संघर्षमयी लढवय्ये व्यक्तीमत तथा युवा नेतृत्व म्हणून ख्याती असलेले भोकर व परिसरातील सर्व परिचित नाव म्हणजेच राजेश्वर कदम देशमुख होत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभाजन होण्यापूर्वी पासूनचे पक्षनिष्ठ कार्यकर्ते.युवा व सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना आपला हक्काचा माणूस वाटणारे संघटन कुशल नेतृत्व.उच्च शिक्षित,अभ्यासू व अनुभवाच्या बळावर राजकीय आणि प्रशासनावर पटलावर चांगली पकड असल्याने भोकर नगर परिषदेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून भ्रष्टाचारींना तुरुंगवास घडवून आणणारा धाडसीपणा त्यांच्यात आहे.त्यामुळे त्यांना येथील सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करावा लागला.असे असतांनाही संघटन कुशलतेच्या बळावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार) वाढविण्यासाठी अनेक परिश्रम घेतले आहेत.नुकत्याच झालेल्या नवनियुक्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष पदावरुन पदोन्नतीकरुन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील पदोन्नतीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.परंतू त्यांना या पदाची जबाबदारी नको आहे.याविषयी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मी पक्ष वाढीसाठी काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता असून कोणत्याही पदाची मला अपेक्षा नाही.माझी नियुक्ती करतांना व भोकर तालुकाध्यक्ष पदावरुन मुक्त करतांना वरिष्ठांनी माझ्याशी कसलाही विचार विनिमय केलेला नाही.म्हणून मला हे नवनियुक्त पद नको आहे.तसेच मी एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे व माझ्या काही अडचणींमुळे सदरील पदाच्या जबाबदारीस मला न्याय देता येऊ शकणार नाही‌.त्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत राहिल,असे ही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close