आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियराज्य

प्रहारचे अभ्यासू लढवय्ये नेतृत्व ॲड.शेखर कुंटे यांचा पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत झाला जाहीर प्रवेश

शिवसेना नेते खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु भाऊ कडू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत(एकनाथ शिंदे) जाहीर प्रवेश केला व विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. त्यामुळे बच्चु भाऊ कडू यांचे नेतृत्व मानणाऱ्या प्रहार पक्ष व संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेचा मार्ग निवडला असून प्रहारचे भोकर तालुकाध्यक्ष तथा एक अभ्यासू लढवय्ये नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले ॲड. शेखर सतिशराव कुंटे यांनी देखील त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अधिकृत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असून तालुक्यातील पक्ष वाढ व बळकटीसाठी त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष तथा नेते आमदार बच्चु भाऊ कडू यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व पक्षाने त्यांच्या पक्ष प्रवेशास न्याय देत विधान परिषद सदस्यत्व बहाल केले.त्यामुळे प्रहार पक्ष व त्या अंतर्गत असलेल्या काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता.परंतू प्रहारचे भोकर तालुकाध्यक्ष ॲड.शेकर कुंटे व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला नव्हता. त्यामुळे शिवसेना नेते खा.श्रीकांत शिंदे हे नुकतेच नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असतांना ॲड.शेखर कुंटे व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी खा.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या पक्ष प्रवेशात त्यांच्यासोबत प्रवेश करणाऱ्यांत प्रामुख्याने प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख राजूभाऊ इबितवार,युवक तालुकाध्यक्ष सुनील उल्लेवाड,भोकर शहराध्यक्ष गणेश घीसेवाड, पोमनाळा शाखाध्यक्ष गजानन पाटील सोळंके,नागपूर शाखाध्यक्ष विकास उल्लेवाड यासह आदींचा समावेश आहे.सदरील पक्ष प्रवेश प्रसंगी राज्याचे मंत्री प्रकाश अबिटकर,नांदेड शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील,आमदार बाबुराव कोहलीकर,माजी खासदार सुभाष वानखेडे,नांदेड जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांसह भोकर तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती.
ॲड.शेखर कुंटे यांनी प्रहार पक्ष व संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून शोषित, वंचित,पीडित,शेतकरी,दिव्यांग व आदींच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन अनेकांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यातील अनेक प्रश्नांची उकल होऊन अनेकांना त्याचा लाभ ही झाला आहे. शांत,संयमी,उच्च शिक्षित,अभ्यासू व संघटन कुशल व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेल्या ॲड.शेखर कुंटे यांची शासकीय व‌ प्रशासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असून न्यायासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा चांगलाच हातखंडा आहे.त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाने तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढ व बळकटीस चांगलाच फायदा होणार आहे,असे अनेकांतून चर्चील्या जात असून त्यांचा या निर्णयाचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close