आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियराज्य

सेवाभावी व्यक्तीमत्व इंजि.विश्वंभर पवार यांचा शिवसेनेत झाला प्रवेश

शिवसेना नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह अनेकांनी केला प्रवेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंजि.विश्वंभर पवार यांनी हदगाव येथील शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना नेते खा.डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) जाहीर प्रवेश केला असून या प्रवेश सोहळ्यात त्यांच्यासह भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व समर्थकांनी ही जाहीर प्रवेश केला आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ तथा नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह,कृषि व सामाजिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून बहुपरिचित असलेले तथा स्व. डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक इंजि.विश्वंभर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलिनीकरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांना साथ देत भोकर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम पणे उभी केली.याची दखल घेऊन स्व.अजित दादा पवार यांनी त्यांच्यावर जिल्हा नियोजन समिती सदस्य व पक्षाच्या उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढविण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत केले.ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली. याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग असतो.अडचणीत सापडलेल्या शेतकरी व गोरगरीबांना ते सातत्याने मदत करतात.विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनांमधून उमेदवारी दाखल केली होती, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली.त्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर पडले होते.परंतू त्यांचे संघटन कौशल्य व पक्ष वाढीचे काम पाहून स्व.अजित दादा पवार यांनी त्यांना परत पक्षात घेतले होते.परंतू दादांच्या आकस्मिक निधनानंतर नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल झाले.त्यामुळे इंजि.विश्वंभर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वव्यापी नेतृत्व पाहता वंचित,पीडित,शोषित व गोरगरिबांना न्याय ते देऊ शकतात असा अभ्यास झाल्यामुळे इंजि.विश्वंभर पवार हे शिवसेनेकडे आकर्षित झाले व हदगाव जि. नांदेड येथे दि. २८ मे २०२६ रोजी शिवसेना नेते खा.डॉ.श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,आ.हेमंत भाऊ पाटील,शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांत मडावी,माजी खा.आनंद परांजपे,आ.बालाजी कल्याणकर, आ.बाबुराव कोहळीकर,आ.आनंद बोंढारकर,नांदेड जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील,गंगाधर बडूरे,उमेश मुंडे, गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी प्रवेश केलेल्यात प्रामुख्याने डॉ.पुरुषोत्तम कल्याणकर,चेतन पाटील सोनारीकर,सरपंच संतोष पाटील चिंचाळकर,रवी गेंटेवार,सिद्धू पाटील चिंचाळकर,विजय पाटील सोळंके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहम्मद बुर्‍हाण यांच्यासह आदी ४५ पदाधिकार्‍यांचा समावेश होता.त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून त्यांची संघटन कुशलता ही भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना वाढीसाठी व बळकटीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close