आपलं नांदेडआरोग्यनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्य

ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीला भोकर मध्ये दुकाने बंद ठेवून विक्रेत्यांनी दिला पाठींबा

औषधी विक्री दुकाने बंदला भोकर मध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोरोना महामारीच्या काळात सरकारने ऑनलाईन औषधी विक्री व होम डिलिव्हरी देण्याबाबत एक विशेष जी.आर.काढला होता.कोरोना हद्दपार झाला, परंतू तो जी. आर.अद्यापही मागे घेण्यात आला नसल्याने ऑनलाईन ई-पोर्टलद्वारे औषधी विक्री सुरुच आहे.याचा फटका असंख्य औषधी विक्री दुकानांना बसत आहे.देशभरात व राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीचा जी.आर.शासनाने मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी केली आहे.तसेच संबंधितांना अनेकदा निवेदने ही दिली आहेत.परंतू याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि.२० मे २०२६ रोजी देशव्यापी दुकाने बंद ची हाक देण्यात आली होती.याच अनुषंगाने भोकर येथील औषधी दुकाने बंद ठेवून विक्रेत्यांनी निषेध व्यक्त केला व उपरोक्त मागणीला उत्स्फूर्तपणे पाठींबा दिला आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात काढण्यात आलेल्या जी.आर.चा आधार घेत सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातुन ऑनलाईन औषध विक्री,ई-पोर्टल व जीएसार ८१७ (इ) दि.२८ ऑगस्ट २०१८,तसेच कोविड जीएसार २२० (इ),दि.२६ मार्च २०२० नुसार औषधी विक्री होत आहे.हे जी.आर.मागे घेण्याबाबत अनेक वेळा संबधित मंत्री महोदय,प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटुन ही विनंती केली आहे.परंतू याबाबत शासन व प्रशासनाची भुमिका नकारात्मक दिसून येत आहे.म्हणून याविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार,दि. २० मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.या आवाहनास भोकर मधील सर्व औषधी विक्रेत्यांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली होती. तसेच कोणत्याही रुग्णांस या बंदचा नाहक त्रास सोसावा लागू नये व सर्वांना औषधी उपलब्ध व्हावीत म्हणून शहरातील ५ दुकाने चालू ठेवली होती.
सदरील बंद बाबत नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना या दुकानदारांनी निवेदन पाठवून दिले असून दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून पो.नि.अजित कुंभार यांना ही निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शंतनू कोटगिरे,संजय मोटे, भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड,यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close