आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

भोकर उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर पापाराव चव्हाण करताहेत आमरण उपोषण

बंजारा समाजाच्या संविधानिक मागण्या सरकारने मंजूर कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु-डॉ.यु.एल.जाधव

बंजारा समाजास एस.टी.आरक्षणात समाविष्ट करण्यात यावे या व अन्य न्यायीक मागण्यांसाठी हा बंजारा संघर्ष योद्धा करत आहे आमरण उपोषण

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हैद्राबाद गॅझेटियरच्या प्रमाणे बंजारा समाजास अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे व अन्य न्यायीक मागण्यांसाठी बंजारा संघर्ष योद्धा पापाराव चव्हाण यांनी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि.७ ऑक्टोबर पासून अमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यांची तबियत खालावत आहे.या उपोषणास तालुक्यातील समाजाचा वाढता पाठिंबा मिळत असून आमच्या संविधानिक मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्यात,अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु असा इशारा संत सेवालाल महाराज नंगारा भवन स्मारक समिती भोकर चे अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते डॉ.यु.एल.जाधव यांनी दिला आहे.

हैद्राबाद गॅझेटियरच्या प्रमाणे बंजारा समाजास अनुसूचित जमाती(एस.टी.) आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी बंजारा संघर्ष योद्धा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पापाराव चव्हाण यांनी दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते.हे उपोषण दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी सोडतांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत समाजाची एक बैठक घेऊन लवकरच सदरील मागणी मंजूर करु,असे आश्वासन दिले होते.तसेच यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा काढण्यात आला.यावेळी देखील पालकमंत्री व माजी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते.परंतू ती मागणी अद्यापही पुर्ण करण्यात आली नसल्याचे बंजारा संघर्ष योद्धा पापाराव चव्हाण यांनी पुनश्च एकदा दि.७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या उपोषणाणा हा तिसरा दिवस असून त्यांची तबियत खालावत आहे.सदरील मागणी बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी असल्याने होत असलेल्या उपोषणास तालुक्यातील समाज बांधवाचा पाठींबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

बंजारा समाजाच्या संविधानिक मागण्या सरकारने मंजूर कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु -डॉ.यु.एल.जाधव

भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बंजारा संघर्ष योद्धा पापाराव चव्हाण यांनी समाजाच्या न्यायीक मागण्यांसाठी सुरु केलेल्या अमरण उपोषणाची सरकार व प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.कारण हैद्राबाद हैद्राबाद गॅझेटियरच्या नोंदी प्रमाणे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात बंजारा समाजास अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे समाजोन्नती झाली आहे.तेथील समाज बांधव व मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बंजारा समाजात रोटी, बेटी,खान,पान,सगे, सोयरे,बोली भाषा सर्व काही समान आहे.परंतू असे असतांनाही तेथील समाज एस.टी.आरक्षण प्रवर्गात आहे व महाराष्ट्रातील समाज वेगवेगळ्या प्रवर्गात आहे.त्यामुळे येथील समाज अनेक योजना व उन्नतीपासून वंचित आहे. त्यामुळे त्यामुळे पापाराव चव्हाण यांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणाची व राज्यात होत असलेल्या विविध आंदोलनाची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या संविधानिक मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात,अन्यथा यापुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संत सेवालाल महाराज नंगारा भवन स्मारक समिती भोकर चे अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते डॉ.यु. एल.जाधव यांनी दिला आहे.सदरील अमरण उपोषणस्थळी त्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यास पाठींबा दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.राम नाईक, माजी संचालक अप्पाराव राठोड,बाळू महाराज,युवा कार्यकर्ते विशाल जाधव,मनोजकुमार राठोड,सखाराम राठोड यांसह बहुसंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close