आपलं नांदेडधार्मिकनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्यसामाजिक

महाशिवरात्री निमित्त भोकर मध्ये दि.१५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान भव्य यात्रेचे आयोजन

पशु व कृषी प्रदर्शन,कीर्तन व लावण्यखणीसह कबड्डी आणि कुस्त्यांचे ही आयोजन/खा.अशोकराव चव्हाण व आ.ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पशु व कृषी प्रदर्शन,कीर्तन व लावण्यखणीसह कबड्डी आणि कुस्त्यांचे ही आयोजन

खा.अशोकराव चव्हाण व आ.ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील हेमाडपंथी महादेव मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्री निमित्त दि.१५ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यानच्या काळात भजन,कीर्तन, लावण्यखणी,कबड्डी व कुस्त्यांचे सामने होणार आहेत. यात्रेच्या आरंभदिनी उद्घाटनासाठी आमदार ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.तर भव्य कुस्त्यांच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.
भोकर येथील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदीर प्रांगणात महाशिवरात्री निमित्त अनेक वर्षापासून भव्य ग्राम यात्रा भरते.मोठी परंपरा लाभलेली ही यात्रा दि.१५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधी दरम्यान होणार असून या यात्रेचा दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता कृषी व पशु प्रदर्शनाने होणार आहे.याचे उद्घाटन आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके,तहसिलदार विनोद गुंडमवार, नगरपरिषदचे मुख्याधिकारी ऋषभ पवार,पोलीस निरीक्षक अजित कुंभार,कार्यकारी अभियंता चोपडे,वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाने,तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे,तर रात्री ८:०० वाजता सालासर भजनी मंडळ नांदेड यांचा भजनाचा कार्यक्रम होईल व  मध्यरात्री १२:०० वाजता श्री महादेवाचा अभिषेक आणि महापुजा नगराध्यक्ष भगवानराव दंडगे यांच्या हस्ते होणार आहे.
दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता कबड्डीच्या सामन्यांचा प्रारंभ होणार आहे व रात्री ८:०० वाजता ह.भ. प.पुरुषोत्तम पाटील यांचे कीर्तन होईल.तर दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी कबड्डीचे सामने व रात्री ८:०० वाजता ह.भ. प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता कुस्त्यांच्या झुंजीचा प्रारंभ होईल,यात पहिले बक्षिस १ लाख १ हजार १११ रुपये असल्याने महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्या पहावयास मिळणार आहेत.सदरील कुस्त्यांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजता सोलापूर येथील लावण्यवतींच्या ‘लावण्यखणी’ लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

उपरोक्त सर्व कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील जनतेनी लाभ घ्यावा,असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड,कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपाध्यक्ष सतीश देशमुख,बालाजी घिसेवाड,डॉ.बालाजी बिल्लरवार,श्रीपाद पटवेकर,कोषाध्यक्ष दिलीप सोनवाडे, सचिव बी.आर.पांचाळ,आकाश गेंटेवार,श्रीकांत दरबस्तवार यांच्यासह यात्रा समिती व नगरपरिषदेच्या  वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close