आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

इंजि.विश्वंभर पवार यांनी भोकर येथील आजारी मुलीच्या उपचारासाठी केली ११ हजाराची मदत

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ती रक्कम मुलीच्या वडिलांकडे केली सुपूर्द

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महात्मा गांधी नगर भोकर मध्ये राहणाऱ्या अवघ्या ७ वर्षाच्या मुलीला गंभीर आजार झाला आहे.तिच्या आई वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्याने या परिवाराने उपचारासाठी लागणाऱ्या पैशासाठी मदतीचे आवाहन केले आहे.हे माहित झाल्यामुळे समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेल्या इंजि.विश्वंभर पवार यांनी मदतीचा खारीचा वाटा उचलण्यासाठी हात पुढे केले व उपचारासाठी रोख ११ हजार रुपये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तिच्या वडिलांखडे सुपूर्द केले.तसेच यावेळी दानशूरांनी ही मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी नगर भोकर येथील रहिवासी असलेले राजू श्रीपतवार यांच्या अवघ्या ७ वर्षाच्या निरागस मुलीला ब्लड कॅन्सर या आजाराने विळख्यात घेतले आहे.तिच्यावर नांदेड व अन्य शहरांतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.परंतू तिचे आई वडील यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम नव्हे तर हालाखीची आहे.त्यामुळे ते तिच्या उपचारासाठी अपुरे पडत आहेत.म्हणून त्यांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.हे माहित झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवी व्यक्तीमत्व इंजि.विश्वंभर पवार यांनी तिच्या उपचारार्थ ११ हजार रुपये मदत देण्यासाठी पुढाकार घेतला.तसेच दि.१६ ऑक्टोबर २०२५ रोजी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ती रक्कम तिच्या वडिलांकडे सुपूर्द केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी आमदार मोहनराव हंबर्डे,माजी आमदार सुभाष साबणे, माजी सभापती नागनाथ घिसेवाड,तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,आनंद पाटील ढवळे,आनंद डांगे यांसह आदींची उपस्थिती होती.यावेळी सदरील मदतीमुळे तिच्या कुटूंबियांनी धन्यवाद मानले असून मानवतावादी दृष्टिकोनातून दानशूरांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close