आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

मुख्यमंत्री असतांना काही करता आले नाही,आता तर त्यांना ‘वाळीत’ टाकलय मग ते विकास कसा करणार ?

भोकर येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सोडले टिकास्त्र

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : एक काळ राज्याचे मुख्यमंत्री नेतृत्व केलेल्या स्वयंभू नेत्यांचा भोकर तालुका व भोकर विधानसभा मतदारसंघ आहे.येथील परिस्थिती काय आहे,तर खड्यात माणूस पडला तरी दिसत नाही.आणि ते म्हणतात हा मतदारसंघ टॉप टेन मतदार संघात न्यायचा आहे.परंतू मुख्यमंत्री असतांना त्यांना काही करता आले नाही,आता तर त्यांना ‘वाळीत’ टाकलय, मग ते विकास कसा करणार? आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर अशाप्रकारे सोडले टिकास्त्र. भोकर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर,भोकर व मुदखेड येथे दि.१६ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(अजित पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकी घेण्यात आल्या.कै.लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालय भोकर येथे भोकर शहर व तालुक्यातील पक्ष बळाचा आढावा घेण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते.तर प्रमुख पाहुणे माजी आमदार मोहन हंबर्डे,सुभाष साबने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी,प्रदेश सचिव नानवटे, माधव पावडे,उत्तमराव सोनकांबळे,माजी जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,ग्रंथालय जिल्हाध्यक्ष आनंदराव ढवळे,असंघटित कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,भोकर विधानसभा अध्यक्ष शिवाजी पाटील लगळुदकर,हदगाव विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव,माजी उपसभाती सुरेश बिल्लेवाड यांसह आदींची उपस्थिती होती.

आढावा बैठकीचे प्रास्ताविक भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी केले.तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय करावे लागेल याविषयी महिला आघाडीच्या यशोदाबाई शेळके,माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर व माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांनी सविस्तर मांडणी केली.तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी भोकर तालुका व विधानसभा मतदारसंघातील जलजीवन व जलसाठ्यांविषयीच्या  जीवंत प्रश्नांनांची उकल करत हा अनुशेष भरुन काढला पाहिजे असे मत व्यक्त केले.तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, शेतकरी नेते शरद जोशी म्हणायचे की एक दाना पेरायचा व हजारो दाने मिळवायचे.त्यांचे हे म्हणणे खासदार अशोक चव्हाण यांनी अंगिकारले असून ते नगर परिषदेत एक दाना पेरतात व त्यातून हजारो दाने कमवितात.याचबरोबर ते असे ही म्हणाले की,खासदार,आमदार कसे असावेत हे पहायचे असेल तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाहिले पाहिजे.ते आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी वेळ देतात.परंतू येथील खासदार व आमदार यांना भेटायचे असेल तर त्यांच्या पीए च्या माध्यमातून जावे लागते.तसेच आमदार हा जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा,सहज भेटणारा व जनतेचे प्रश्न समजून घेऊन सोडविणारा असावा.आता येथील ही दंडेलशाही संपविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकजुटीने काम करा व उमेदवार निवडून आणा मी,पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची ताकद आपल्या पाठीशी आहे. सदरील आढावा बैठकीस श्रीकांत पाटील किन्हाळकर, खाजू भाई इनामदार,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती,गणेश उर्फ पप्पू बोलेवार,गिरीश कदम रावणगांकर, परसू पाटील डौरकर,बबलु पाटील मातुळकर,उद्योजक सखाराम वाघमारे,महीला पदाधिकारी ममताताई सोनकांबळे,राजेश्री ताई कराळे, कल्पना कदम,यांसह भोकर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते.संपन्न झालेल्या बैठकीचे सुरेख असे सुत्रसंचालन तालुका सचिव महेंद्र कांबळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार ओबीसी नेते नागोराव शेंडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close