Uncategorizedआपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा भोकर च्या नुतन भव्य इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार लोकार्पण

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भोकर च्या सुसज्ज अशा वास्तूचा लोकार्पण सोहळा दि.२४ एप्रिल २०२६ रोजी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे राहणार आहेत.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भोकर ची सुसज्ज अशी भव्य इमारत बांधण्यात आली आहे.सदरील इमारत बांधकामासाठी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर कडून या इमारतीसाठीची जागा लीज भाडेतत्वावर घेण्यात आली आहे.सदरील इमारत उभारणीसाठी स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे जेष्ठ जावई तथा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व सुपूत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भोकर ची ही इमारत संबंध जिल्ह्याचे आकर्षण ठरली आहे.अशा या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा दि.२४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कषि उत्पन्न बाजार समिती भोकर च्या परिसरात होणार असून या लोकार्पण सोहळ्यास उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत.तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण हे राहणार आहेत.तसेच प्रमुख अतिथी म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण,हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर,नांदेड जि.म. बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर,राज्यसभेचे खा.डॉ.अजित गोपछडे,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण,बँकेचे उपाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस,सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांसह आदींची उपस्थिती राहणार आहेत.या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,संचालिका सौ.सविता रामचंद्र मुसळे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close