भोकर नगर परिषद निवडणुकीचा धुरळा शमला,थेट जनतेतला नगराध्यक्ष कोण होणार? याकडे अनेकांचे लक्ष
नगराध्यक्ष पदाच्या ९ व नगरसेवक पदांच्या ९३ उमेदवारांसाठी झाले एकूण ७५.२७ टक्के मतदान

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता निवडणूकीच्या रणांगणात नगराध्यक्ष पदाचे ९ व ११ प्रभागात २२ नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवार उभे होते.परंतू प्रभाग क्र.१ ब मधील ६ उमेदवारांची निवडणूक पुढे ढकलली असल्याने ११ प्रभागातील २१ नगरसेवक पदांचे ९३ उमेदवार अशा एकूण १०२ उमेदवारांसाठी दि.२ डिसेंबर रोजी प्रभाग क्र.११ मधील दोन उमेदवारांत झालेला किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. शहरातील एकूण २८७४८ मतदारांपैकी १०८६९ पुरुष,१०७६९ स्त्री व इतर १ अशा एकूण २१६३९ मतदारांनी उपरोक्त उमेदवारांसाठी इव्हिएम मशिनवर मतदानाचा हक्क बजावला असून झालेल्या मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी ७५.२७ टक्के आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व उमेदवारांचे इव्हिएम यंत्र बंद भवितव्य दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी उघडणार आहे.तर थेट जनतेतला भाग्यवान नगराध्यक्ष कोण होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे.भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९ उमेदवार उभे होते.तर नगरसेवक पदासाठी ११ प्रभागांतून ९९ उमेदवार उभे होते.परंतू प्रभाग क्र.१ ब करिता दि.२० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असल्याने येथील ६ उमेदवार वगळून ११ प्रभागातील एकूण ९३ नगरसेवक पदाचे उमेदवार व ९ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशा एकूण १०२ उमेदवारांसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शहरातील एकूण २८७४८ मतदारांपैकी १०८६९ पुरुष,१०७६९ स्त्री व इतर १ असे एकूण २१६३९ मतदारांनी ३१ मतदान केंद्रावर सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजता पर्यंत उपरोक्त उमेदवारांसाठी मतदानाचा हक्क बजावला असून सायंकाळी ५:३० यावेळेत मतदान केंद्र हद्दीत आलेल्या अनेक मतदारांनी रात्री उशिरा ९:०० वाजता पर्यंत मतदान केले आहे. झालेल्या मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी ७५.२७ टक्के आहे.
दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रावर सकाळी थंडी असतांनाही मतदारांनी ५:२० च्या अगोदरच रांगा लावल्या व सकाळी ५:३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.प्रभाग क्र.५ च्या मतदान केंद्रावरील एक इव्हिएम मशिन थोडा वेळ बंद पडली होती.परंतू काही वेळातच ती तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यात आली व मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.तर प्रभाग क्र.११ च्या मतदान केंद्रावर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे च्या दोन उमेदवारांत किरकोळ वादातून धक्काबुक्की झाली.वेळीस पोलीस यंत्रणेने दोघांनाही ताब्यात घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.रात्री उशिरापर्यंत ही या प्रकरणी कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मतदान प्रक्रिया वेळे दरम्यानच्या काळात नांदेड जिल्हा अधिकारी राहुल कर्डीले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या व परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन केले. सायंकाळी ५:३० वाजता या वेळेत मतदान केंद्र कक्षात आलेल्या बहुसंख्य मतदारांनी रात्री ९:०० वाजता पर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व उमेदवारांचे इव्हिएम यंत्र बंद भवितव्य दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी उघडणार आहे.उमेदवारांचे भवितव्य बंद ते इव्हिएम मतदान यंत्रे भोकर नगर परिषद कार्यालयातील इमारतीच्या ‘स्ट्रॉंग रूम’ मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहेत.तर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी ऋषभ पवार व नायब तहसिलदार काशिनाथ डांगे यांच्या सुक्ष्म सुनियोजनाखाली,तसेच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नियोजनबद्ध चोख पोलीस बंदोबस्तात निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.
भोकर नगर परिषदेंतर्गत प्रभाग निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे…
रात्री उशिरा ९:०० वाजता पर्यंत मतदानासाठी काही मतदान केंद्रावर लागली होती रांग…
भोकर शहरातील एकूण २८७४८ मतदारांपैकी १०८६९ पुरुष,१०७६९ स्त्री व इतर १ अशा एकूण २१६३९ मतदारांनी उपरोक्त उमेदवारांसाठी ३१ मतदान केंद्रावरील इव्हिएम मशिनवर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.तो प्रभाग निहाय पुढील प्रमाणे आहे.
*प्रभाग क्र.१ करिता मतदान केंद्र २ असून त्यांचे क्र.१ व २ आहेत – मतदान केंद्र क्र.१ वरील ४९२ पुरुष व ४५३ स्त्री अशा एकूण ९४५ मतदारांपैकी ३६७ पुरुष व ३२६ स्त्री अशा एकूण ६९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७३.३३ टक्के आहे.
*मतदान केंद्र क्र.२ वरील ४८९ पुरुष व ४५६ स्त्री अशा एकूण ९४५ मतदारांपैकी ३६३ पुरुष व ३२१ स्त्री अशा एकूण ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७२.३८ टक्के आहे. *प्रभाग क्र.२ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे मतदान केंद्र क्र.३,४ व ५ असे आहेत.मतदान केंद्र क्र.३ वरील ५०२ पुरुष व ४९२ स्त्री अशा एकूण ९९४ मतदारांपैकी ३९२ पुरुष व ३४७ स्त्री अशा एकूण ७३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७४.३५ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.४ वरील ४९१ पुरुष व ५०५ स्त्री अशा एकूण ९९६ मतदारांपैकी ३५७ पुरुष व ४४९ स्त्री अशा एकूण ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७०.८८ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.५ वरील ४८६ पुरुष व ५१२ स्त्री अशा एकूण ९९८ मतदारांपैकी ५५३ पुरुष व ३४८ स्त्री अशा एकूण ७०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७०.२४ टक्के आहे.
*प्रभाग क्र.३ करिता मतदान केंद्र ३ असून त्यांचे क्र.६,७ व ८ असे आहेत.मतदान केंद्र क्र.६ वरील ४४० पुरुष व ४४१ स्त्री अशा एकूण ८८१ मतदारांपैकी ३७० पुरुष व ३५७ स्त्री अशा एकूण ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ८२.५२ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.७ वरील ४४६ पुरुष व ४३४ स्त्री अशा एकूण ६६२ मतदारांपैकी ३२९ पुरुष व ३३३ स्त्री अशा एकूण ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७५.२३ टक्के आहे. मतदान केंद्र क्र.८ वरील ४२३ पुरुष व ४५९ स्त्री व इतर १ अशा एकूण ८८३ मतदारांपैकी ३३२ पुरुष व ३४४ स्त्री व इतर १ अशा एकूण ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७६.६७ टक्के आहे.
*प्रभाग क्र.४ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.९,१० व ११ असे आहेत.मतदान केंद्र क्र.९ वरील ४८५ पुरुष व ४८९ स्त्री अशा एकूण ९७४ मतदारांपैकी ३१८ पुरुष व ४०० स्त्री अशा एकूण ७१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७३.७२ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१० वरील ४५५ पुरुष व ५१४ स्त्री अशा एकूण ९६९ मतदारांपैकी ३३९ पुरुष व ३५५ स्त्री अशा एकूण ६९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७१.६२ टक्के आहे. मतदान केंद्र क्र.११ वरील ४७६ पुरुष व ४९७ स्त्री अशा एकूण ९७३ मतदारांपैकी ३९४ पुरुष व ३९१ स्त्री अशा एकूण ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ८०.६८ टक्के आहे.
*प्रभाग क्र.५ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.१२,१३ व १४ असे आहेत.मतदान केंद्र क्र.१२ वरील ४५२ पुरुष व ४९२ स्त्री अशा एकूण ९४४ मतदारांपैकी ३६५ पुरुष व ३७१ स्त्री अशा एकूण ७३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७७.९७ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१३ वरील ४३४ पुरुष व ५१२ स्त्री अशा एकूण ९४६ मतदारांपैकी ३४७ पुरुष व ३९५ स्त्री अशा एकूण ७४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७८.४४ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१४ वरील ४६९ पुरुष व ४७७ स्त्री अशा एकूण ९४६ मतदारांपैकी ३६२ पुरुष व ३६४ स्त्री अशा एकूण ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७६.६४ टक्के आहे.
*प्रभाग क्र.६ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.१५,१६ व १७ असे आहेत.मतदान केंद्र क्र.१५ वरील ३९३ पुरुष व ३९१ स्त्री अशा एकूण ७८४ मतदारांपैकी ३०६ पुरुष व २८९ स्त्री अशा एकूण ५८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७४.६२ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१६ वरील ४०३ पुरुष व ३९९ स्त्री अशा एकूण ८०२ मतदारांपैकी ३५९ पुरुष व २६८ स्त्री अशा एकूण ६२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७८.१८ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१७ वरील ३८० पुरुष व ४१३ स्त्री अशा एकूण ८९३ मतदारांपैकी ३०१ पुरुष व ३३७ स्त्री अशा एकूण ६३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ८०.४५ टक्के आहे. *प्रभाग क्रमांक ७ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.१८,१९ व २० असे आहेत.मतदान केंद्र क्र.१८ वरील ४८९ पुरुष व ५२६ स्त्री अशा एकूण १०१५ मतदारांपैकी ३७५ पुरुष व ४११ स्त्री अशा एकूण ७८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७७.४४ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.१९ वरील ५०० पुरुष व ५१३ स्त्री अशा एकूण १०१३ मतदारांपैकी ३३८ पुरुष व ३२८ स्त्री अशा एकूण ६६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ६५.७५ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२० वरील ४८७ पुरुष व ५३२ स्त्री अशा एकूण १०१९ मतदारांपैकी ३८० पुरुष व ३५५ स्त्री अशा एकूण ७३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७२.१३ टक्के आहे.
*प्रभाग क्र.८ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.२१,२२ व २३ असे आहेत.मतदान केंद्र क्र.२१ वरील ५२७ पुरुष व ५०२ स्त्री अशा एकूण १०२९ मतदारांपैकी ३६८ पुरुष व ३५४ स्त्री अशा एकूण ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७०.१७ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२२ वरील ५२७ पुरुष व ५०२ स्त्री अशा एकूण १०१३ मतदारांपैकी ३५४ पुरुष व ३४३ स्त्री अशा एकूण ६९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ६८.८१ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२३ वरील ४०८ पुरुष व ४५३ स्त्री व इतर १ अशा एकूण ८६२ मतदारांपैकी २९० पुरुष व ३३५ स्त्री अशा एकूण ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७२.५१ टक्के आहे.
*प्रभाग क्र.९ करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.२४,२५ व २६ असे आहेत.मतदान केंद्र क्र.२४ वरील ४२२ पुरुष व ४४१ स्त्री अशा एकूण ८६३ मतदारांपैकी ३२७ पुरुष व ३३१ स्त्री अशा एकूण ६५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७६.२५ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२५ वरील ४१५ पुरुष व ४४९ स्त्री अशा एकूण ८६४ मतदारांपैकी ३४८ पुरुष व ३५१ स्त्री अशा एकूण ६९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ८०.९० टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२६ वरील ४०८ पुरुष व ४१४ स्त्री अशा एकूण ८२२ मतदारांपैकी ३१९ पुरुष व २८७ स्त्री अशा एकूण ६०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७३.७२ टक्के आहे.
*प्रभाग क्र.१० करिता ३ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.२७, २८ व २९ असे आहेत.मतदान केंद्र क्र.२७ वरील ४२४ पुरुष व ३९९ स्त्री अशा एकूण ८२३ मतदारांपैकी ३१९ पुरुष व ३१४ स्त्री अशा एकूण ६३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७६.९१ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२८ वरील ४१२ पुरुष व ४०९ स्त्री अशा एकूण ८२१ मतदारांपैकी ३६२ पुरुष व ३५२ स्त्री अशा एकूण ७१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ८७.०९ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.२९ वरील ४९१ पुरुष व ४९३ स्त्री अशा एकूण ९८४ मतदारांपैकी ३६७ पुरुष व ३६३ स्त्री अशा एकूण ७३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७४.१९ टक्के आहे.
*प्रभाग क्र.११ करिता २ मतदान केंद्र असून त्यांचे क्र.३० व ३१ असे आहेत.मतदान केंद्र क्र.३० वरील ५०२ पुरुष व ४८१ स्त्री अशा एकूण ९८३ मतदारांपैकी ३९४ पुरुष व ३७७ स्त्री अशा एकूण ७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७८.४३ टक्के आहे.मतदान केंद्र क्र.३१ वरील ४७८ पुरुष व ५०६ स्त्री अशा एकूण ९८४ मतदारांपैकी ३७४ पुरुष व ३८२ स्त्री अशा एकूण ७५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची सरासरी टक्केवारी ७६.८३ टक्के आहे.
अशा प्रकारे शहरातील १४१९० पुरुष,१४५५६ स्त्री व इतर २ असे एकूण २८७४८ मतदारांपैकी १०८६९ पुरुष,१०७६९ स्त्री व इतर १ असे एकूण २१६३९ मतदारांनी मतदान केले असून त्यांची एकूण सरासरी टक्केवारी ७५.२७ टक्के आहे.



