आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

भोकर येथे १६ ऑक्टोबर रोजी रा.काँ.पार्टीच्या आढावा बैठकीचे आयोजन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वतयारीचा घेतल्या जाणार आढावा व काही मान्यवरांचा होणार आहे पक्षप्रवेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पुर्वतयारीसंदर्भाने दि.१६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर येथे आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.

याचबरोबर सदरील बैठकीस नांदेड उत्तर जिल्ह्यातील पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या उपस्थितीत भोकर तालुक्यातील व शहरातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वतयारीचा आढावा घेतला जाणार आहे.तरी या बैठकीस सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,सरपंच,उपसरपंच,चेअरमन,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य,सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य यांसह आदींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे विनंतीपर आवाहन भोकर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील लगळुदकर,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,भोकर शहराध्यक्ष फयुम पटेल यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close