अंबुज प्रहार विशेषआपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडा

अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत होत असलेल्या भोकर रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर-अपुर्व वशिष्ठ

अत्यावश्यक सुविधांसह दिव्यांग व्यक्तींसाठी हे स्थानक अधिक सुलभ करण्यासाठी दिला जात आहे भर-श्रीनिवास सुर्यवंशी

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : प्रवाशांना अत्याधुनिक सेवा व सुविधा मिळाव्यात या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या संकल्पनेतून सन २०२३ मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरु करण्यात आली.या योजने अंतर्गत भोकर रेल्वे स्थानकाच्या विविध कामांसाठी १२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून यातून होत असलेली कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग मंडळाचे मंडळ अभियंता अपुर्व वशिष्ठ यांनी दिली आहे.तर अत्यावश्यक सुविधांसह दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे स्थानक अधिक सुलभ करण्यासह दोन उद्वहन(लिफ्ट) बसविण्याचे काम लवकरच पुर्ण होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग मंडळाचे सहाय्यक मंडळ प्रबंधक श्रीनिवास सुर्यवंशी यांनी दिली आहे.
प्रवाशांना अत्याधुनिक सेवा व सुविधा मिळाव्यात या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या संकल्पनेतून दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी अमृत भारत स्थानक योजना घोषित केली.या योजनेंतर्गत देशातील रेल्वे स्थानकांवर विविध विकासात्मक कामे करण्यात येत आहेत.अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गतच्या नांदेड विभाग मंडळातील मुदखेड ते आदिलाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात समावेश असलेल्या भोकर रेल्वे स्थानकाच्या कामासाठी १२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.हा निधी प्राप्त करुन घेण्यासाठी प्रथम तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व तद्नंतर राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केला आहे. 

अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत होत असलेल्या विविध कामांची पाहणी व जनजागृती करण्यासाठी दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभाग मंडळाचे मंडळ अभियंता अपुर्व वशिष्ठ, सहाय्यक मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीनिवास सुर्यवंशी,सहाय्यक मंडळ अभियंता बिमल कुमार शर्मा,एस.एस.ई वर्क जनक राजमिना,ट्रॉलीमन गोपाळ कोरडे,शषांक कठाडे यांनी भेट दिली.यावेळी मंडळ अभियंता अपुर्व वशिष्ठ व सहाय्यक मंडळ प्रबंधक श्रीनिवास सुर्यवंशी यांनी आमच्याशी संवाद साधला.संवाध साधतांना मंडळ अभियंता अपुर्व वशिष्ठ म्हणाले की,प्रवाशांना आंतरराष्ट्रीयस्तरावर सुविधा पुरविण्याच्या उद्देश्याने अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशातील नामांकित केलेले १०५ रेल्वे स्थानक व यापैकीच एक असलेल्या भोकर रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे.नांदेड जिल्ह्यातील संस्कृतीचे दर्शन घडावे या उद्देशाने स्थानकावर प्रादेशिक किंवा ऐतिहासिक वास्तुकलेची कलाकुसर केली जाणार आहे.यासोबतच प्रतीक्षालयाचे नूतनीकरण करून नवीन स्वच्छतागृहाचे बांधकाम ही केले जात आहे.स्थानकाच्या आतील व बाहेरील सुशोभीकरण करण्यात येत आहे.ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.तर सहाय्यक मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीनिवास सुर्यवंशी म्हणाले की,अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत भोकर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करून प्रवाशांसाठी अधिक सुविधा निर्माण करुन देण्यात येत आहेत.तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी स्थानक अधिक सुलभ बनवण्यावर भर दिला जात असून त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यात येत आहेत.तिकीट खिडकी ही वेगळी केली जाणार आहे. त्याच बरोबर त्यांना उड्डाण पूलावरुन सोयीस्करपणे जाण्यासाठी दोन उद्वहन (लिफ्ट) बसविण्यात येणार असून हे काम लवकरच पुर्णत्वास येणार आहे.स्थानका बाहेर वाहन थांबा व सुशोभीकरण ही करण्यात येणार आहे.तसेच हरित विद्युत योजनेंतर्गत सौर उर्जा निर्मिती,पावसाचे पाणी व्यर्थ वाया जाऊ नये व त्याचा पुनर्वापर करण्यात यावा यासाठी जलपुनर्भरण योजनेचे काम ही प्रगतीपथावर असून स्थानकाच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने अन्य कामे ही केली जाणार आहेत.असे ही ते म्हणाले.तर संपादक उत्तम बाबळे व पत्रकार विशाल जाधव यांनी त्यांच्याकडे भोकर रेल्वे स्थानकावर धनबाद,पाटना, संत्रागाच्छी यासारख्या एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा देण्यात यावा आणि मुंबई ला ये जा करण्यासाठी भोकर स्थानकावरुन जाणाऱ्या नुतन एक्स्प्रेस रेल्वे सुरु करण्यात याव्यात अशी मागणी केली.यावर त्यांनी म्हटले की,ही बाब आमच्या अधिकाराखालील नाही.परंतू ही मागणी आमच्या वरीष्ठांकडे आम्ही नक्कीच मांडू.यावेळी भोकर स्थानक व्यवस्थापक के.के.झा यांसह आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close