राष्ट्रीय काँग्रेस च्या भोकर तालुका निरीक्षक पदी अजिज कुरेशी यांची नियुक्ती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुर्वतयारीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे ही नियुक्ती

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे.त्या अनुषंगाने निवडणूकीच्या पुर्वतयारीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जिल्हा, विधानसभा व तालुका निरीक्षकांच्या नियुक्त्या करणे सुरु केले असून भोकर तालुका निरीक्षक पदी राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड येथील जेष्ठ पदाधिकारी अजिज कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद,नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक अनुषंगाने प्रत्येक पक्ष पूर्वतयारी करत आहे.राष्ट्रीय काँग्रेस पक्षास ही पुर्वतयारी करणे गरजेचे असल्याने जिल्हा,विधानसभा व तालुका पातळीवर निरीक्षकांच्या नियुक्त्या करणे सुरु केले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या आदेशानुसार जेष्ठ पदाधिकारी अजिज कुरेशी यांची भोकर तालुका निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच त्यांना कार्यालयीन सचिवांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून निवडणुकीच्या दृष्टीने भोकर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाई करावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचे अभिनंदन होत असून सदरील बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती भोकर तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील व भोकर शहराध्यक्ष तौसिफ इनामदार यांनी दिली आहे.



