आपलं नांदेडआरोग्यनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

भोकर पोलीसांनी प्रतिबंधीत गुटख्यासह ७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल पकडला

अवैध गुटखा तस्करी व विक्री प्रकरणी चौघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्य शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधीत केलेल्या गुटख्यासह १ कार असा एकूण ७ लाख ६२ हजार २० रुपयाचा मुद्देमाल दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री भोकर पोलीसांनी पकडला असून गुटखा तस्करी व अवैध विक्री प्रकरणी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारची तपासणी केली असता त्या कारमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला,गुटखा रजनीगंधा पान मसाला,सिग्नेचर पान मसाला,विमल पान मसाला, राजनिवास सुगंधीत पान मसाला,बाबा १२०,झेड.एन.०१ जाफराणी जर्दा असे एकुण १९४  पाकिट गुटखा मिळून आला.ज्याची किंमत अंदाजे १ लाख ६२ हजार २० रुपये आहे आणि त्या कारची किंमत अंदाजे ६ लाख रुपये आहे. असा एकूण ७ लाख ६२ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.कार चालकाची चौकशी केले असता त्याचे नाव शेख तन्वीर शेख अहमद (२७)रा.सईद नगर भोकर असल्याचे समजले.तसेच नईम जिलानी कुरेशी व्यवसाय-व्यापार,रा.सईद नगर भोकर,आर. आर.आमान (पुर्ण नाव माहित नाही) व रिझवान रा. हिमायतनगर ह.मु.म्हैसा,तेलंगणा राज्य (पुर्ण नाव माहित नाही) हे तिघे त्याचे सहकारी असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी जमादार सोनाजी कानगुले यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं. ५२४/२०२५ कलम १२३,२२३,२७४,२७५,३,(५) भारतीय न्याय संहिता व सहकलम २६,२७,३०(२),(अ),५९ अन्न सुरक्षा मानके कायदा प्रमाणे उपरोक्त चौघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील आरोपींना अटक करण्यात आली असून पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहा.पो.नि.शैलेंद्र औटे हे करत आहेत.या कारवाईतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close