भोकर येथे ६ ऑक्टोबर रोजी ‘थेट हृदयाशी भिडणाऱ्या व कौटुंबिक नाते घट्ट जोडणाऱ्या’ व्याख्यानाचे आयोजन
भोकर विचार विकास मंचच्या वतीने ‘न समजलेले आई-बाप’ या विषयावर प्रा.वसंत हंकारे यांचे होणार आहे व्याख्यान...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आजच्या ५ जी च्या युगात भासी कौटूंबिक नात्यात आभासी समज-गैरसमजाचा प्रादुर्भाव अधिक होत गेल्याने सुसंवादाच्या अभावाने पालक,मुले व कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होत आहे.कौटुंबिक नात्यातील विस्कटलेली ही योग्य पद्धतीने पुन्हा कशी सुरळीत करता येऊ शकते ? या अनुषंगाने भोकर विचार विकास मंचच्या वतीने ‘न समजलेले आई-बाप’ या विषयावर प्रा.वसंत हंकारे यांच्या सुसंस्कारी थेट हृदयाशी भिडणाऱ्या व कौटुंबिक नाते घट्ट जोडणाऱ्या व्याख्यानाचे दि.६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता,स्व.डॉ.शंकरराव चव्हाण बाजार समिती शेड,नवा मोंढा,भोकर येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी या व्याख्यानाचा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भोकर विचार मंचचे अध्यक्ष डॉ.यु.एल.जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
भोकर विकास विचार मंचच्या वतीने अध्यक्ष डॉ.यु.एल. जाधव,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.व्यंकट माने,उपाध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, साहित्यिक चंदू चक्रवार,डॉ.विठ्ठल माने, विनोद श्रीखंडे,संजय दरबस्तवर व आदिंच्या उपस्थित दि.३ ऑक्टोबर २०२५ रोजी पवनकर कॉम्प्लेक्स,किनवट रोड भोकर येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी साहित्यिक चंदू चक्रवार व प्रा.डॉ.माने यांनी संघटनेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याविषयी माहिती दिली.तर अध्यक्ष डॉ.यु.एल.जाधव यांनी आयोजित व्याख्यानाविषयी माहिती दिली.यावेळी ते म्हणाले की,बदलत्या काळात कौटुंबिक नात्यांत होत असलेल्या परिणाम व दुष्परिणामावर चिंतन आणि प्रबोधन होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.याच अनुषंगाने सुप्रसिद्ध विचारवंत व समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांच्या मार्मिक,सोप्या शैलीतून हृदयावर वैचारिक घाव घालून कौटुंबिक नाती जोडणाऱ्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे दि.६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवा मोंढा भोकर येथे सकाळी ११:०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.सदरील व्याख्यान श्रवणासाठी तालुक्यातील इयत्ता ८ वी च्या वरील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित रहावे असे अपेक्षित असून बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन डॉ.यु. एल. जाधव व भोकर विचार विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे.




