Uncategorized

भोकर नगर परिषद निवडणूकीसाठीच्या ईव्हीएम मशीनची केली प्रथम एफ.एल.सी.चाचणी व तपासणी

तीन दिवसात केवळ एक नामनिर्देशनपत्र दाखल...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने पुरविलेल्या ईव्हीएम मशिनची प्रथम एफ.एल.सी. चाचणी व तपासणी नुकतीच करण्यात आली असून तीन दिवसात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू इच्छीणाऱ्या केवळ एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.

भोकर नगर परिषद निवडणूक व आगामी जिल्हा परिषद निवडणूकीच्या संदर्भाने दि.११ नोव्हेंबर रोजी भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी ३१ मतदान केंद्राची प्राथमिक तपासणी केली. तसेच मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांसह केंद्र व्यवस्थित आहेत काय, मतदारांना कुठली अडचण येऊ नये,अशा प्रकारे बाबी तपासण्यात आल्या.याच बरोबर ३१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुरविलेल्या ईव्हीएम मशीनची एफ.एल.सी. चाचणी व तपासणी भोकर तहसिल कार्यालयात करण्यात आली.ईव्हीएम मशीन व्यवस्थित आहेत का नादुरुस्त झाले आहेत,नादुरुस्त असतील तर त्यांना दुरुस्त करून घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या.यावेळी मास्टर ट्रेनर,झोनल अधिकारी, तलाठी यांसह निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी ११ प्रभागातील १४ हजार १९० पुरुष,१४ हजार ५५६ स्त्री व इतर २ असे एकूण २८ हजार ७४८ मतदार ३१ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्रभाग क्रमांक १ व ८ मध्ये २ आणि उर्वरित सर्व प्रभागात ३ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.तसेच होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तीन दिवसात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी केवळ एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close