शैक्षणिकसामाजिक

आदर्श गाव ‘नागापूर’ चा चमू राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी हिवरेबाजार येथे रवाना

प्रशिक्षणार्थी चमू च्या वाहनास आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आदर्श गाव संकल्प प्रकल्प समिती,पुणे यांच्या वतीने नागापूर ता.भोकर या गावाची ‘आदर्श गाव’ म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.या आदर्श गावातील ग्रामस्तरीय समिती सदस्य व ग्रामस्थांसाठी हिवरेबाजार जि. अहमदनगर येथे दि.१० ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने आदर्श गाव नागापूरच्या प्रशिक्षणार्थींचा चमू हिवरेबाजार येथे रवाना झाला असून त्यांच्या वाहनास भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून यशस्वी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रशिक्षणासाठी रवाना झालेल्या चमूत आदर्श गाव योजनेचे प्रकल्प प्रमुख तालुका कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,बचत गटाच्या महिला अध्यक्ष,ग्रामकार्यकर्ता,शालेय मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व इतर काही ग्रामस्थ अशा एकूण १५ सदस्यांचा समावेश आहे.

प्रथम आदर्श गाव नागापूरच्या प्रशिक्षणार्थींच्या चमूस प्रथम ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर भोकर येथे आमदार ॲड.श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांची रवानगी केली आहे.

यावेळी आदर्श गाव प्रकल्प समितीचे तालुका प्रमुख, तालुका कृषी अधिकारी,तसेच स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती,भोकर चे सभापती, उपसभापती,सर्व संचालक मंडळ, भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते,नागापूर येथील ग्रामस्थ व कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close