आपलं नांदेडक्राइमनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्य

अशी ही बनवाबनवी : पांढऱ्या रेती खालून होत आहे काळ्या रेतीची तस्करी

भोकर चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार व पथकाने 'ते' टिप्पर पकडून केले रेती तस्करांच्या बनवाबनवीचे पितळ उघड

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील रेती तस्करांनी पोलीस व प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत पांढऱ्या रेती (डस्ट) खाली काळी रेती लपवून विक्री करण्याचा ‘अशी ही बनवाबनवी’ चा नुतन प्रयोग सुरु केला होता. परंतू पोलीस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या पथकाने ती रेती नेत असलेले ‘ते’ टिप्पर पकडून त्या रेती तस्करांचे बनवाबनवीचे पितळ उघड केले असून रेती आणि त्या टिप्परसह ७ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील पथक कर्तव्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.
दगडापासून तयार करण्यात आलेली कृत्रिम रेती(डस्ट) विक्री करण्यासाठी शासनाने मुभा दिलेली आहे.याचा फायदा घेत पोलीस व प्रशासनाच्या दिशाभुल करुन त्या पांढऱ्या रेती आड नदीपात्रातून अवैधरित्या आणलेली नैसर्गिक काळी रेती विक्री करण्याचा अशी ही बनवाबनवी चा नुतन प्रयोग सुरु केला असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना मिळाली.ही माहिती त्यांनी आपले वरीष्ठ अधिकारी अर्थातच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके यांना दिली व त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेन्द्र औटे,जमादार सोनाजी कानगुले, राजेश घुन्नर,सिद्धार्थ केळकर,साहेबराव हौसरे व बालाजी बुलबुले यांचा सहभाग असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक कर्तव्यावर पाठविले.कर्तव्यावर असलेल्या त्या पथकाने मिळालेल्या गोपीनाथ माहिती आधारे दि.७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:५० वाजताच्या दरम्यान भोकर शहरातील हुंडेकर कॉलनी ते बोरगावकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर रेती वाहक टिप्परचा शोध घेतला असता अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असलेले एक टिप्पर त्यांना मिळून आले.
यावेळी पोलीस पथकाने एम.एच-०४ ई.वाय.०२६३ क्रमांकाचा त्या टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ३ ब्रास रेती मिळून आली.परंतू एक अजब प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.तो म्हणजे वर पांढऱ्या रंगाची दगडी(डस्ट) कृत्रिम रेती व त्याखाली अवैध विक्रीसाठी नेत असलेली ३ ब्रास काळी रेती मिळून आली.एकूणच रेती तस्करांचा अशा प्रकारे पोलीस व प्रशासनाची दिशाभुल कण्याचा आणि अवैधरित्या रेती विक्रीचा नुतन प्रयोग समोर आला.तसेच त्या टिप्पर चालकाची चौकशी केली असता त्याचे नाव दत्तात्रय रघुनाथ पांचाळ(३८)रा. नारवट,ता. भोकर,जि.नांदेड असे असल्याचे समजले व त्याच्या जवळ त्या रेतीची विक्री करण्याचा परवाना कुपन(रॉयल्टीचे कागदपत्र) नसल्याची बाब ही निदर्शनास आली.यामुळे सदरील रेती ही तस्करी मार्गाने अवैधरित्या विक्रीसाठीच नेत असल्याचे निष्पन्न झाले.यावरुन ७ लाख रुपये किमतीचा तो टिप्पर व त्यातील अंदाजे १५ हजार रुपयाची रेती पोलीसांनी ताब्यात घेतली आणि एकूण ७ लाख १५ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पो.कॉ.साहेबराव भिमराव हौसरे यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादीवरुन गु.र.नं.९२/२०२६ कलम ३०३(२) भारती न्याय संहिता २०२३ प्रमाणे उपरोक्त उल्लेखीत टिप्पर चालक व टिप्परचा मालक यांच्या विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार सोनाजी कानगुले हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close