Uncategorizedआपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

विठ्ठल धोंडगे यांनी ५ किलोचा केक कापून खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस केला साजरा

भोकर येथे भाजपा कार्यकर्ते विठ्ठल धोंडगे यांच्या निवासस्थानी खा.अशोक चव्हाण यांनी दिली दिवाळी शुभेच्छा भेट

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी भोकर येथे आलेल्या माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपा कार्यकर्ते विठ्ठल पाटील धोंडगे यांच्या राजाई निवासस्थानी भेट दिली.दि.२८ ऑक्टोबर रोजी खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असल्याच्या औचित्याने यावेळी विठ्ठल पाटील धोंडगे यांनी ५ किलोचा केक त्यांच्या हस्ते कापून वाढदिवस साजरा केला.याप्रसंगी खा.अशोक चव्हाण यांनी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर धोंडगे परिवाराने दिवाळी व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
दिवाळी निमित्त माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, आ. ॲड.श्रीजया चव्हाण,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी भोकर येथे शुभेच्छापर भेट देण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी काही प्रतिष्ठित व्यापारी व भोकर नगर परिषदेच्या इच्छूक उमेदवारांच्या निवासस्थानी भेट दिली.याच दरम्यान प्रभाग क्रमांक २ चे इच्छुक उमेदवार भाजपाचे कार्यकर्ते विठ्ठल पाटील धोंडगे यांच्या राजाई निवासस्थानी भेट दिली.दि.२८ ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस आहे.हे औचित्य साधून यावेळी विठ्ठल पाटील धोंडगे यांनी ५ किलोचा केक खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.तसेच खा. अशोक चव्हाण यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तर सर्व उपस्थितांना खा.अशोक चव्हाण, आ.ॲड.श्रीजया चव्हाण यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.आ.अमरनाथ राजूरकर,सभापती जगदीश पाटील भोसीकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील कापसे,भोकर विधानसभा समन्वयक भगवानराव दंडवे, भाजपा तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकूठंवार,भाजपा शहराध्यक्ष विशाल माने,संतोष मारकवार,ॲड.विशाल दंडवे, डॉ.राम नाईक,वेणू पाटील कोंडलवार,मॉन्टी ऱ्याकावार,डॉ. फेरोज ईनामदार, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,शेख नाजीम,शेख फारूख,अविनाश वाघमारे, भोकर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, यांसह प्रभाग क्र.०२ मधील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close