आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक
स्व.विद्याताई मेंडके यांच्या परिवारास भोकर तालुक्यातील ४७ पोलीस पाटलांनी केली ४६ हजाराची मदत
त्यांच्या दोन वर्षांच्या बाळाच्या संगोपनासाठी ती रक्कम केली फिक्स डिपॉझिट

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील आमदरीवाडी येथील सेवारत महिला पोलीस पाटील विद्याताई मेंडके यांचा डेंग्यू आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यांची कौटूंबिक परिस्थिती गरीबिची असल्याने मदतीची अत्यंत आहे.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ ता.भोकर च्या वतीने तालुक्यातील एकूण ४७ पोलीस पाटलांनी ४६ हजार रुपयांची मदत त्यांच्या कुटूंबियांना केली आहे.





