आपलं नांदेडक्राइमनांदेड जिल्हाभोकरमराठवाडा

तेलंगणा राज्यातून विक्रीसाठी येत असलेला प्रतिबंधित गुटखा भोकर पोलीसांनी पकडला

गुटखा माफियास केली अटक व १ लाख ७ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यासाठी प्रतिबंधित केलेला गुटखा तेलंगणा राज्यातून माफियांमार्फत तस्करी मार्गे भोकर येथे दुचाकीवरुन येत असलेला ६२ हजार ५५० रुपयाचा गुटखा व ती दुचाकी भोकर पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडला असून त्या माफियास अटक करण्यात आली आहे.तसेच त्याच्या जवळील गुटखा व दुचाकी असा एकूण १ लाख ७ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भोकर पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते.त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे गुटखा माफियांच्या शोधार्थ मोहिम राबवित असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,तेलंगणा राज्यातून एका दुचाकीवरुन प्रतिबंधित गुटखा भोकरकडे येत आहे.ही माहिती त्यांनी वरीष्ठांना कळविली व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकर च्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,भोकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी दगडु हाके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पो.उप.नि.दिलीप जाधव,पोलीस अंमलदार,सहाय्यक पो. उप.नि.संजय पवार,जमादार सोनाजी कानगुले,जमादार राजेश घुन्नर,पो.कॉ.साहेबराव हौसरे व पो.कॉ.गुरुदास आरेवार यांचे पथक गतीमान केले.
या पथकाने दि.५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान साफळा रचला व भोकर पोलीस ठाणे हद्दीतील किनवट रोडकडुन बटाळा चौक ते म्हैसा बायपास रोडवर डॉ.एकाळे यांचे शेताजवळ एका काळया रंगाच्या दुचाकीवरुन मानवी आरोग्यास घातक असलेला गुटखा विक्री करण्यासाठी येत असलेल्या एका इसमास पकडले. एम.एच.२६ बी.बी.८३२० क्रमांकाच्या त्या दुचाकीवर बांधलेल्या नायलॉन पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला फिरोझा पान मसाला नावाचा एकूण २६० पाकीट,प्रती पाकीट १२० रुपये प्रमाणे ३१ हजार २०० रुपये व एएए (AAA) नावाचा गुटखा एकूण १६५ पाकीट,प्रती पाकीट १९० रुपये प्रमाणे ३१ हजार ३५० रुपये असा एकूण ६२ हजार ५५० रुपयाचा अवैध गुटखा मिळून आला.

यावेळी त्या दुचाकीस्वाराची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आमेर खान मुझफर खान (३१) व्यवसाय मजुरी रा.खुदबाईनगर,देगलुर नाका नांदेड असे सांगितले व त्याने तो प्रतिबंधित गुटखा एस.एल.जर्दा विक्री दुकान निर्मल,तेलंगणा राज्य येथून आणला होता आणि त्या दुकान मालकाचे नाव माहित नसल्याचे सांगितले.यावरुन त्याच्या जवळील ६२ हजार ५५० रुपयाचा अवैध गुटखा व ४५ हजार रुपयाची ती दुचाकी असा एकूण १ लाख ७ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.तसेच जमादार सोनाजी जळबाजी कानगुले यांनी फिर्याद दिल्यावरुन उपरोक्त नाव उल्लेखीत गुटखा माफिया व निर्मल येथील त्या गटखा विक्रेत्या दुकादाराविरुद्ध गु.र.नं. १७५/२०२६ कलम २६(२),२७,२३,३०(२)(a),५९(iv) अन्न सुरक्षा मानके कायदा व सहकलम १२३,२२३,३(५)भारतीय न्याय संहिता प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.त्या दुचाकीस्वार गुटखा तस्करास अटक करण्यात आली व पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.उप.नि.दिलीप जाधव हे करीत आहेत.सदरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी त्या सर्वांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close