Tue. May 14th, 2024

साहित्यिका छाया बेले यांना ‘सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान’ पुरस्कार जाहीर

Spread the love

राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव जुन्नर येथे या पुरस्काराने त्यांना करण्यात येणार आहे सन्मानित

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : येथील प्रथितयश लेखिका व कवयित्री छाया बेले यांच्या ‘हॅपी होम च्या भिंतीआड’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाची शिवाजी चाळक पुरस्कृत ‘सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान'(काव्य) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी, ता.जुन्नर,जि.पुणे च्या वतीने आयोजित ३१ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव- २०२४ सोहळ्यात त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तर उपरोक्त पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्यिका छाया बेले यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

‘हॅपी होमच्या भिंती आड’ हा स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा त्यांचा काव्य संग्रह अहमदनगर येथील साहित्याक्षर या नामांकित प्रकाशनाने(१४ जुलै २०२३) प्रकाशित केला असून यापुर्वी त्यांचे ‘लढाई अस्तित्वाची’ (१ जुलै २०१२) व ‘घर याचे हृदयी माझ्या’ (१ जानेवारी २०१८)हे काव्यसंग्रह, ‘फरफट’ ही कादंबरी व ‘चकवा’,’वैशाख वणवा ‘हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.तर अस्मितादर्श,अक्षरगाथा, अक्षरगणगोत,साहित्य समन्वय,परिवर्तनाचा वाटसरू,दै. एककमत,दै.यशवंत,रानफूल (दिवाळी अंक),सायबर क्राइम (साप्ताहिक),अंबुज प्रहार न्युज लाईव्ह दिवाळी विशेषांक -२०२३ यांसह इत्यादी विशेषांकातून कथा,कविता,लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणी नांदेड,परभणी वरून काव्यवाचन आणि अनेक साहित्य संमेलनातून निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे.याच बरोबर ६ व्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात त्या काव्य मैफिल सत्राच्या त्या अध्यक्षा होत्या.

त्यांच्या साहित्य संपदेची दखल झाल्याने मुक्तासाळवे सार्वजनिक वाचनालय,उदगीर जि.लातूर चा उत्कृष्ट वाड़मय निर्मिती पुरस्कार-२०१३(राज्य स्तरीय),डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार-२०१४ (राज्य स्तरीय),अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद नांदेडचा गुरु रविदास साहित्य पुरस्कार-२०१५ (राज्य स्तरीय),अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद,नांदेड महाराष्ट्र राज्य चा क्रांतीगुरू लहुजी साळवे पुरस्कार- २०१५(राज्य स्तरीय),श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा,ता.लोणार,जि. जालना चा आद्य क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे साहित्य साधना पुरस्कार-२०१८(राज्य स्तरीय),अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य चा विद्रोही कवयित्री पुरस्कार-२०१९(राज्य स्तरीय),डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार-२०१९ (लातूर), तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नर चार वैशाख वणवा या कथासंग्रहास सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार- २०१९(राज्य स्तरीय) व फरफट या कादंबरीस सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अध्यासनचा राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कार-२०२२ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.तसेच काही दिवसांपूर्वीच अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कवि भुजंग मेश्राम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘उलगुलान’ काव्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नांदेड येथील प्रथितयश लेखिका व कवयित्री छाया बेले यांच्या ‘हॅपी होमच्या भिंतीआड’ या काव्यसंग्रहाची पुन्हा एकदा शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी शिवाजी चाळक पुरस्कृत सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (काव्य) पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याबाबदचे पत्र शिवाजी चाकक यांनी नुकतेच त्यांना पाठविले असून सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व रोख रक्कम २ हजार रुपये असे शिवाजंली साहित्य सन्मान पुरस्काराचे स्वरुप आहे.
तर शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी- पिंपळवंडी-जुन्नर यांचे तर्फे दि.२५, २६,२७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या ३१ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव सोहळ्या प्रसंगी दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपरोक्त साहित्य सन्मान पुरस्कार देऊन साहित्यिका छाया बेले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तर उपरोक्त पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याने अनेकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.संपादक उत्तम बाबळे यांच्या वतीने देखील त्यांचे अगदी मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील यशासाठी शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !