Fri. May 17th, 2024

भोकर विधानसभेतील २ लाख ९४ हजार ४०९ मतदार उद्या बजावणार आपल्या मतदानाचा हक्क

Spread the love

सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे-जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत

८५-भोकर विधानसभा मतदार संघातील प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे.१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील ३४३ मतदान केंद्रावर २ लाख ९४ हजार ९०४ मतदार उद्या दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत निवडणूक रिंगणातील २३ उमेदवारांसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.तर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे व मतदारांनी निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी,असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत आणि ८५-भोकर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे.

सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे-जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत

८५-भोकर विधानसभा मतदारसंघात भोकर,मुदखेड व अर्धापूर या तीन तालुक्यांचा समावेश असून एकूण ३४३ मतदान केंद्र आहेत.तालुका निहाय अनुक्रमे भोकर तालुक्यात १३५ मतदान केंद्र असून यात शहरी भागात २८ व ग्रामीण भागातील १०७ मतदान केंद्रांचा समावेश आहे.तर एकूण १ लाख ११ हजार १५६ मतदार असून यात ५६ हजार ३४६ पुरुष,५४ हजार ८१० स्त्री,१ हजार ५२० जेष्ठ(८५+) व ५९० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.मुदखेड तालुक्यात १०५ मतदान केंद्र असून यात शहरी भागात २२ व ग्रामीण भागात ८३ मतदान केंद्रांचा समावेश आहे.तर एकूण ९४ हजार ६७७ मतदार असून यात ४९ हजार ४४ पुरुष,४५ हजार ६२९ स्त्री,४ इतर (तृतीय पंथी), १ हजार ८९५ जेष्ठ व १ हजार ३१४ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.तसेच अर्धापूर तालुक्यात १०३ मतदान केंद्र असून यात शहरी भागात २२ व ग्रामीण भागात ८१ मतदान केंद्रांचा समावेश आहे.तर एकूण ८८ हजार ५७६ मतदार असून यात ४५ हजार ७६४ पुरुष,४२ हजार ८१० स्त्री,२ इतर,१ हजार २१३ जेष्ठ व ५८६ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ३४३ मतदान केंद्रातील शहरी ७२ व ग्रामीण २७१ मतदान केंद्रावर १ लाख ५१ हजार १५४ पुरुष,१ लाख ४३ हजार २९४ स्त्री,६ इतर,४ हजार ६२८ जेष्ठ व २ हजार ४९० दिव्यांग असे एकूण २ लाख ९४ हजार ४०९ मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.याच बरोबर १८ ते १९ वर्ष वयोगटातील ४ हजार ३७६ तरुण असून यात २ हजार ६४५ पुरुष व १ हजार ७३१ स्त्री मतदारांचा समावेश आहे.सदरील तरुण मतदार हे पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तसेच जि.प.के.प्रा.शाळा नुतन भोकर येथील नवी इमारत पश्चिम बाजु कडील उजवी बाजु रूम नं.२ आणि जि.प.कन्या शाळा बार्ब येथील पूर्व बाजु वर्ग ५ वा असे २ महिला संचलित मतदान केंद्र,सामान्य प्रशासन विभाग पंचायत समिती कार्यालय भोकर येथे १ दिव्यांग संचलित मतदान केंद्र,जि.प. प्रा.शाळा नारवट ता.भोकर व मौलाना अब्दुल कलाम आजाद, मुदखेड येथील उत्तर बाजुची खोली क्र ४ असे एकूण २ युवा संचलित मतदान केंद्र,तर जि.प.प्रा.शाळा नागापुर ता.भोकर येथे १ यूनिक मतदान केंद्र,अशा प्रकारे एकूण ६ विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.१ हजार ९८१ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून १२ स्थायी पथक,९ व्हिडिओ शूटिंग पथक,९ भरारी पथक,५ आचार संहिता पथक नेमण्यात आले आहेत.

दिव्यांग व ८५+ वयोवृध्दांचे मतदान
एकूण दिव्यांग मतदार ३९ असून यापैकी ३६ मतदान झाले आहे.तर ८५+ जेष्ठ मतदार असून यापैकी १३१ मतदान झाले होते.तसेच ६८१ पोस्टल बॅलेट व ६८६ ईडीसी वाटप करण्यात आले आहे.

तर भोकर विधानसभा मतदार संघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर चे तहसिलदार सुरेश घोळवे,मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर,अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या समन्वयातून उद्या होणारी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत.याच बरोबर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व भोकर अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर चे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,मुदखेड चे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, अर्धापूर चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सुनियोजनाखाली दरम्यानच्या काळात कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी ३५ पोलीस अधिकारी,४७५ पोलीस कर्मचारी आणि २७७ होमगार्ड चोख बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत आहेत. अशी माहिती ८५-भोकर विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
१६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.यासाठी ८५- भोकर विधानसभा मतदार संघातील ३४३ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मतदान यंत्रे व मतदान साहित्यासह पथकांची रवानगी करण्यात आलेली आहे.शासकीय मुलांचे वसतिगृह भोकर येथे दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ६ ते १२ या कालावधीत मतदान साहित्य वितरणाचे कामकाज पार पडले आहे.यावेळी निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली आहे.तर भोकरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनातून भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे,नायब तहसीलदार उमर सय्यद,विजयकुमार पाटे,यांच्या अधिनस्त पथकांनी आचारसंहिता ईव्हीएम वितरण,मंडप व भोजन व्यवस्था,वाहन व्यवस्था, मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर,संतोष कामठेकर,मारोती जगताप,सूर्यकांत जायभाये यांच्या अधिनस्त पथकांनी मतदान अधिकारी, कर्मचारी हजेरी व्यवस्था,ओळखपत्रे वितरण,पोस्टल बॅलेट व निवडणूक कार्य प्रमाणपत्राचे वितरण,क्षेञिय अधिकारी समन्वय,अर्धापूर चे तहसीलदार रेणुकादास देवणीकर,नायब तहसीलदार सुनील माचेवाड,शिवाजी जोगदंड यांच्या अधिनस्त टेबल निहाय तिसरे प्रशिक्षण व मतदान साहित्याचे वितरणाचे काम झाले आहे.मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व भोकरचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करून मतदान पथकासह पोलीसांची रवानगी केली आहे.मतदान साहित्य वितरण व मतदान पथकांची रवानगी याकामी भोकर,मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी,तलाठी, अव्वल कारकून,महसूल सहाय्यक,शिपाई,कोतवाल,वाहन चालक, तसेच इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !