Fri. May 17th, 2024

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास भोकर जिल्हासत्र न्यायालयाने दिली ३ वर्षाची शिक्षा

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या शेतातून घराकडे एकटीच जात असल्याचे पाहून ३२ वर्षीय तरुणाने वाईट हेतूने तिचा हात धरुन मनाला लज्जास्पद वाटेल असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली होती. विनयभंग व पोक्सो च्या कलमांतर्ग गुन्हा दाखल झालेला कासारपेठ तांडा ता.भोकर येथील तो तरुण दोषी ठरल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश १-वाय.एम. एच.खरादी यांनी त्यास ३ वर्षाची शिक्षा व १५०० रुपये दंड सुनावला आहे.

थोडक्यात असे की,कासारपेठ तांडा ता.भोकर जि.नांदेड येथील एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि.३० एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतातून घराकडे निघाली असता ती एकटी असल्याचे पाहून रस्त्यात गावातीलच रहिवासी असलेल्या सुनील गंगाराम राठोड(३२) या तरुणाने तिला अडविले व वाईट हेतूने तिचा हात धरुन मनाला लज्जास्पद वाटेल असे बोलले आणि हे जर कोणास सांगितले तर जीवे मारुन टाकेल,अशी धमकी दिली.यावेळी त्या मुलीने आरडाओरड केल्याने त्या तरुणाने पळ काढला.घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत त्या मुलीने रात्री उशिरा आई-वडीलांना सांगितले.यानंतर दि.१ मे २०२१ रोजी आई-वडीलांसोबत येऊन भोकर पोलीसात तिने रितसर तक्रार दिली.यावरुन सुनील गंगाराम राठोड(३२) रा.कासारपेठ तांडा या तरुणाविरुद्ध गु.र.न१५६/२०२१ कलम ३५४,३५४-अ,५०६ भा.द.वि.,सह कलम ०८ पोक्सो कायदा नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.उप. नि.राणी भोंडवे व पो.कॉ.प्रमोद जोंधळे यांनी सखोल तपास करुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यानच्या काळात मा.न्यायालयात साक्षीदार व पुरावे तपासण्यात आले.यावेळी पोलीसांनी केलेला तपास व सरकारी वकीलाने तपासलेल्या महत्वाच्या साक्षी आणि आरोपीच्या वकीलासोबत झालेल्या युक्तीवादाच्या आधारे दाखल केलेला लेखी युक्तीवाद,मा.उच्च न्यायालयाचे दाखल केलेले न्यायनिवाडे हे आरोपी विरुद्ध गेले.सदरील सबळ पुराव्यानिशी तो तरुण दोषी ठरला.यामुळे भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश १-वाय.एम.एच.खरादी यांनी आरोपी सुनील गंगाराम राठोड यास दि.२० एप्रिल २०२४ रोजी कलम ८ मध्ये ३ वर्ष शिक्षा व कलम ३५४,३५४-अ,५०६ भा.द.वि.प्रमाणे मध्ये प्रत्येकी ५०० रुपये दंड असा एकुण १५०० रुपये दंड.अशी शिक्षा सुनावली आहे.तर सदरील खटल्याच्या दरम्यान न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी फिरोजखॉन पठाण व ए.जी.पी.कार्यालयाचे लिपीक मारोती अटकोरे यांनी सहकार्य केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !