Wed. May 15th, 2024
Spread the love

या धाडसी कारवाईत १७ जुगारी,रोख १ लाख रुपये व एकूण १५ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सिमेलगतच्या मौ. किनी ता.भोकर गाव शिवाराततील एका बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर दि.२७ डिसेंबर रोजी भोकर पोलीसांनी सापळा रचून छापा टाकला व तो जुगार अड्डा उद्धवस्त केला आहे.या धाडसी कारवाईत १७ जुगारींसह एकूण १५ लाख ८२ हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर या कारवाईने जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तेलगणा- महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या मौ.किनी ता.भोकर शिवरात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिल मध्ये काही दिवसांपासून एक आंतरराज्य जुगार अड्डा सुरु झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलीसांना मिळाल्यावरून भोकर पोलीस ठाण्याचे पो. नि.विकास पाटील यांनी पो.उप.नि.दिगंबर पाटील,पो. उप.नि.अनिल कांबळे,सहाय्यक पो.उप.नि.प्रल्हाद बाचेवाड,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन,विकास राठोड,प्रकाश वावळे व महिला पोलीस नायक सिमा वच्छेवार यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०३:३० वाजताच्या दरम्यान उपरोक्त उल्लेखीत बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून छापा टाकला.यावेळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही उच्चभ्रू लोकांना बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळवितांना मिळून आले.पो. नि.विकास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन तो जुगार अड्डा उध्वस्त केला.तसेच त्या जुगाऱ्यांकडून रोख १ लाख ६०० रुपये,१६ किमती मोबाईल,७ दुचाकी व १ चारचाकी वाहन आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १५ लाख ८२ हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

त्या जुगाऱ्यांना भोकर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता जुगार अड्डा चालविणाऱ्याचे नाव संजीव रेड्डी रा.किनी ता.भोकर असे असल्याची माहिती समोर आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य १६ जुगाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.संतोष खलशे रा.दहेगाव,गणेश कदम रा.निघवा,श्रीनिवास जाधव रा.रंजणी,राजकुमार बालिजापल्ली,आनंद राठोड रा. डोडरणा तांडा,देवाला अंकाम रा.भोशी, मल्लेश नारडे रा. कुबेर,बालाजी घोसालवाड रा. बोळासा,विठ्ठल गोपवाड रा.गोडसरा,देविदास येनकुसाब रा.निघवा,गजराज पळसे रा.पळशी, सत्यनारायण शिंदे रा.दहेगाव,सुरेश ठाकूर रा.पळशी, वरील सार्वजण ता.मुधोळ जि.निर्मल,तेलंगणा राज्य येथील आहेत.तर श्रीनिवास कदम रा.लगळूद,गोविंद जाधव रा.महागाव,दिलीप जाधव रा.लगळूद,हे तिघेजण ता.भोकर जि.नांदेड येथील आहेत.

सरकार पक्षातर्फे पो.उप.नि.दिगंबर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या त्या बंद राईस मिलच्या मालकासह उपरोक्त उल्लेखीत एकूण १७ जुगाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास भोकर पोलीस अधिकारी करणार आहेत.सदरील छापा टाकतेवेळी काही जुगाऱ्यांना पसार होण्यात यश आले असले तरी तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या गाव शिवारातील हा जुगार अड्डा भोकर पोलीसांनी या धाडसी कारवाईत उध्वस्त केल्याने दोन राज्यातील जुगाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !