@रानाचा अग्नी पळस..!
लेखिका रुचिरा बेटकर यांचा लेख वाचकांसाठी -संपादक
अंबुज प्रहार विशेष
@रानाचा अग्नी पळस..!
पळस म्हणजे रानाचा अग्नी! पळस बहरतो तेव्हा अख्खं रान पेटल्यासारखं भासतं. म्हणूनच कदाचित त्याला इंग्रजीमध्ये ‘flame of the forest’ म्हणत असतील.
थंडीचे दिवस संपून उष्ण काळ सुरू होण्याआधी ऋतूचक्राच्या आसाभोवती फिरणारी सृष्टीच जणू संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभी असते.’पळसाला पाने तिनच’ ही म्हण फार प्रचलित आहे.म्हणींमध्ये जसा पळस वापरला जातो तसाच याचा उपयोग आयुर्वेदिक औषधींमध्येसुद्धा केला जातो.
तसं पाहायला गेलं तर पळस बहुगुणी आहे.अशा बहुगुणी पळसाची फुलं बहरल्यावर त्यातला रस पिण्यासाठी पळसावर पक्ष्यांची यात्राच भरते जणू.या पक्ष्यांमध्ये आघाडीवर असतात पळस मैना!
निसर्गाच्या सोहळ्यात सहभागी होऊन फुलांचं परागीकरण करणार्या पळसमैना पळसफुलांमधला रस पिऊन परागकण वाहून नेण्यास निसर्गाची एक प्रकारे मदतच करतात.
फार पूर्वी तर नाही म्हणता येणार पण अगदी आता आतापर्यंत होळीला पळस फुलांनी तयार केलेला रंग वापरत होते.कारण एक तर या रंगाला खूप उच्च दर्जाचा सुंगध यायचा आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचा शरीरावर तोटा कमी आणि फायदाच जास्त होत होता.
‘पूर्वी पळस बन’ हे गावाच्या अगदी जवळ असायचे. पळस बन खूप गर्द,अति दाट माजते आणि पळस फुलांच्या सुवासाने अस्सल नाग यामध्ये वावरतात, रमतात.नागासारखा रागीट विषारी सरपटणारा प्राणी गावाजवळ असणे हे गावातील लोकांसाठी अति धोक्याचं होते.
पळसाची अजून एक गोष्ट माझ्या नजरेत भरते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत असूनसुद्धा पळस बहरतो. न बोलता पण माणसाला खूप काही शिकवून जातो पळस!
पूर्वीचे लोकं आजच्या लोकांसारखे उच्चशिक्षित नसतीलही पण निसर्ग वाचन जन्मतः येत असल्यामुळेच आणि निसर्गाशी जुळवून घेतल्यामुळे कदाचित हे लोकं सुखी आणि समाधानी होते.
असा हा समृद्ध बहुगुणी पळस काळाच्या ओघात (अति शहरीकरणामुळे किंवा आपल्या उदासीनतेमुळे) नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.असचं होत राहिले तर जसं पळस नामशेष होऊन,पळस हा पुढच्या पिढीला फक्त चित्रामध्येच बघावा लागेल.
पळस टिकला,बहरला तर कदाचित त्याला बघून आपली पुढची पिढी बहरेल.
होळीच्या सणात वापरतात.एकूणच काय,तर वसंतारंभी फुलणारा आणि भर उन्हाळ्यातही लक्ष वेधून घेणारा पळस हा असा संदर्भसंपन्न असून त्याची मुळे लोकसंस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत.
रूचिरा बेटकर
लेखिका,नांदेड
९९७०७७४२११