शासकीय ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्णांना जवळच्या शासकीय ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस ची सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ.प्रताप चव्हाण,वैद्यकिय अधिक्षक अनंत चव्हाण यांच्या नियोजनानुसार शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि.२५ एप्रिल २०२४ रोजी ‘डायलिसिस’ सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
शासकीय ग्रामीण रुग्णालयात भोकर शहरातील डायलिसिस रुग्णांना सेवा देवून ‘डायलिसिस’ सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून पुढे गरिब व गरजू रुग्णांनी डायलिसिस सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.प्रताप चव्हाण यांनी केले आहे. सदरील सेवेच्या शुभारंभी डायलिसिस विभाग वैद्यकिय अधिकारी डॉ.मंगेश पवळे,डायलिसिस तंत्रज्ञ शंकर अवटे, अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हणे,निलोफर पठाण,संगीता महादले,क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर,औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे,आरोग्य निरिक्षक सत्यजीत टिप्रेसवार,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर,मनोज पांचाळ,अत्रीनंदन पांचाळ,सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,लिपिक प्रल्हाद होळगे,प्रकाश सर्जे, शिंदे व रुग्णांचे नातेवाईक यांसह आदींची उपस्थित होती.