कुपोषण मुक्तीसाठी शासनाच्या उपक्रमात वर्ल्ड व्हिजनचा मोलाचा सहभाग-राहुल शिवशेट्टे
वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेतर्फे करण्यात आले भोकर तालुक्यातील कुपोषित बालकांना प्रोटिनयुक्त सकस आहार किटचे वाटप
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कुपोषण मुक्तीसाठी शासन प्रशासन विविध उपक्रम राबवित असते.ती जबाबदारी शासन प्रशासनाची आहे.परंतू सेवाभावातून पुढे येऊन शासनाच्या उपक्रमांत सहभागी होऊन कर्तव्य बजावणारे खुप कमी लोक असतात.त्या सेवाभावीत अग्रगण्य असलेले नाव नाव म्हणजे वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेचे असून कुपोषण मुक्तीसाठी शासनाच्या उपक्रमात वर्ल्ड व्हिजन इंडिया या सेवाभावी संस्थेचा मोठा सहभाग आहे,असे प्रशंसनीय मनोगत एकात्मिक बालविकास प्रकल्प भोकरचे प्रकल्प अधिकारी राहुल शिवशेट्टे यांनी व्यक्त केले.ते वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने दि.१३ सप्टेंबर रोजी आयोजित कुपोषित बालकांना प्रोटिनयुक्त आहार किट वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
वर्ल्ड व्हिजन इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुपोषण मुक्तीसाठी भोकर तालुक्यातील ३५ गावे दत्तक घेण्यात आले असून या गावांतील कुपोषित बालकांना संस्थेच्या वतीने सतत ६ महिने प्रोटिनयुक्त सकस आहार किट देण्याचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.याच अनुशंगाने दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ९ गावांतील ९ कुपोषित बालकांसाठी किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन भोकर येथील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शाखा व्यस्थापक श्याम बाबू पट्टापू हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय भोकरचे प्रकल्प अधिकारी राहुल शिवशेट्टे,भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड,पत्रकार गंगाधर पडवळे,कमलाकर बरकमकर व शुभम नर्तावार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्तित प्रमुख पाहुणे व संस्थेचे शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते सपना बालाजी हाके,श्रीकांत चंद्रकांत बोडके,आरुषी बलवान जाधव,आनवी परमेश्वर कारगिलवाड,राम बालाजी कारगिलवाड,आरूषी परमेश्वर कारगिलवाड,सोनल अमोल तोडे,निशांत रमेश कोरंटलु, विजय ज्ञानेश्वर गायकवाड या कुपोषित बालकांना व गरोदर मातांना प्रोटिनयुक्त सकस आहार किटचे वाटप करण्यात आले.तर आहार किट वाटप कार्यक्रम व उपक्रम राबविण्याविषयीची भुमिका संस्थेचे कर्मचारी रतिलाल वाळवी यांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केली.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संपादक उत्तम बाबळे म्हणाले की,कुपोषित बालक जन्मास येणे ही नैसर्गिक बाब आहे. परंतू त्या बालकांना विज्ञानिकतेच्या आधाराची जोड घालून विविध सकस आहार देऊन सदृढ करता येऊ शकते. आणि हे करण्यासाठीचे मार्गदर्शनिय मौलिक कृतिशिल कार्य वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था करत आहे.त्यांच्या या उपक्रमाचा लाभ आपण घेऊन या बालकांना कुपोषणमुक्त करुन सशक्त करावे असे ही ते म्हणाले.
तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू हे म्हणाले की, कुपोषण मुक्त बालक आणि गरोदर माता यांच्यासाठी ‘१ हजार दिवस’ हा उपक्रम आम्ही राबवित आहोत.गरोदर माता ही मुल जन्मास घालण्यापर्यंतचे ९ महिने व पुढील उर्वरित दिवस असे एकूण २ वर्षाच्या कार्यकाळात गरोदर माता व बाळ यांची काळजी घेण्यासंदर्भात संस्थेच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.याचाच एक भाग म्हणून कुपोषित बालक व गरोदर माता यांना हे प्रोटिनयुक्त सकस आहार किटचे वाटप प्रति महिना प्रमाणे ६ महिने करत आहेत.यातून सदृढ बालक घडावा व भावी पिढी कुपोषण मुक्त व्हावी हा संस्थेचा उदात्त हेतू आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना राहुल शिवशेट्टे म्हणाले की,काजू,बादाम अशा महागड्या आहाराने कुपोषित बालक सदृढ होतो असे नाही व सर्वसामान्यांना हे परवडणारे ही नाही.परंतू दैनंदिनीच्या आहारात समतोल साधला तर खुप फायदा होऊ शकतो.जसे की,केवळ दाळीच खायच्या व भाजीपाला खायचा नाही. यामुळे हवे प्रोटिन शरिरास मिळत नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या दाळी,भाजीपाला खाने व या बालकांना खाऊ घालने गरजेचे आहे.यासाठीचे मार्गदर्शन व सकस आहार अंगणवाडी मार्फत शासन देते.यातून ही काही बालकांचे कुपोषण दुर होत नसेल तर आमच्याशी व अशा प्रकारे काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांशी संपर्क साधावा नक्कीच सहकार्य मिळेल.तसेच तज्ञांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली कुपोषित बालक आणि पालकांसाठी जिल्हास्थानी १५ दिवसांसाठी निवासी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.कुपोषित बालकांच्या पालकांनी याचा लाभ घेऊन आपल्या बालकांना सदृढ करावे,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.सदरील कार्यक्रमास कुपोषित बालक,पालक व गरोदर माता यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन रतिलाल वाळवी यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास प्रकाश फुलझेले व संस्थेचे कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.