भोकर मध्ये युवा सेनेचा संवाद मेळावा संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना अंतर्गत युवा सेनेच्या संवाद यात्रेच्या अनुषंगाने माजी खासदार तथा विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका स्थानी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२० ऑक्टोबर रोजी शिवसेना नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर येथे युवा संवाद मेळावा संपन्न झाला आहे.
गणराज रिसोर्ट मंगल कार्यालय भोकर येथे दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी युवा सेना तालुका भोकर च्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरील मेळाव्यास नांदेड दक्षिण चे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर,नांदेड ग्रामीण चे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,शिवसेना नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, श्याम वानखेडे,युवा सेना जिल्हाप्रमुख विकास देशमुख, शिवसेना भोकर तालुका प्रमुख तथा भोकर विधानसभा मतदार संघ महायुती समन्वयक अमोल पवार,युवा सेना भोकर तालुका प्रमुख स्वप्नील रेड्डी यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या युवा सैनिकांशी शाखा बांधणी व पक्ष वाढीच्या संदर्भाने उपरोक्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील रेड्डी,ओमसाई होणे,गणेश शेंडगे,रमेश जाधव,गणेश जाधव,अशोक जाधव,शुभम पारटकर, साईनाथ राचेवाड,योगेश चल्लावार,बबलू डूरे,आशिष डुरे,शिवा सूर्यवंशी,साई मेकाले,अजय पिंगलवाड,सतीश शेंडगे, आदेश शेंडगे,विकी पवार,विजय पिंगलवाड यांसह आदी युवासैनिकांनी परिश्रम घेतले.