ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ‘जागतिक मानसिक आरोग्य’ दिन साजरा

प्रसिद्ध उद्योजक स्व.रतन टाटा यांना वाहण्यात आली भावपुर्ण श्रद्धांजली
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुका विधी सेवा समिती भोकर,जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प आणि ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि.१० ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘जागतिक मानसिक आरोग्य’ दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकर न्यायालयाचे सह न्यायाधीश आर.एस.इरले हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश डी.डी.माने,ग्रामीण रुग्णालय भोकर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण,डॉ.शाहू शिराढोणकर,मानसोपचार तज्ञ डॉ.संदेश जाधव यांसह तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.तर मानसोपचार तज्ञ डॉ.शाहू शिराढोणकर यांनी मानसिक आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच अध्यक्षिय समारोप न्यायाधीश आर.एस.इरले यांनी केले.यानंतर उपस्थित काही मानसिक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला. सदरील कार्यक्रमास भोकर न्यायालयातील दिलिप मचेवार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/प्रेरणा प्रकल्प नांदेड येथील अरुण वाघमारे,रुपाली मस्के,ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.