Fri. Apr 18th, 2025

विकास कामांमध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला माझ्याशी आहे-खा.अशोक चव्हाण

Spread the love

नांदेड जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर आणि असंख्य समर्थकांनी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला भाजपात प्रवेश

विरोधकांनी जरी सकारात्मक काम सांगितलं तरी करेन ते मी करेन ; गावातील राजकारण माझ्याशी न जोडता गट, तट बाजूला सारुन माझ्यासाठी एक व्हा!-खा.अशोक चव्हाण

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्री केले,मला मला देखील राज्याचे मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर विधानसभा मतदार संघानेच केली आहे.त्यामुळे येथील मतदार व जनतेचे उपकार आम्ही कदापिही विसरु शकत नाही.मी कुठेही असलो तरी या मतदार संघांच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.तसेच विकास कामांमध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला मी करेन व त्याची गाठ माझ्याशी आहे.असा सज्जड दम देत आपल्या गावातील राजकारण माझ्याशी न जोडता गट, तट बाजूला सारुन मतांचे ध्रुवीकरण(विभाजन ) होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपल्या समोर भारतीय जाणता पार्टीचा उमेदवार म्हणून ॲड.श्रीजया अशोक चव्हाण या येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी विजयी करा असे भावनिक आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.मौ.भोसी ता.भोकर येथे दि.४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर आणि त्यांच्या असंख्य समर्थकांनी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला भाजपात प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्या प्रसंगी खा.अशोक चव्हाण हे बोलत होते.
माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,भोकर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देवतुळे,भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोती झंपलवाड, बाजार समितीचे माजी संचालक धोंडीबा भिसे, संजय बरकमकर,विठ्ठलनाथ डाकोरे,संग्राम वाघमारे यांसह जिल्हा परिषद भोसी गटातील प्रकाश देशमुख भोसीकर यांच्या असंख्य समर्थकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला.मौ.भोसी ता.भोकर येथे दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण,माजी आमदार अमिता अशोक चव्हाण,माजी आमदार अमरनाथ राजूरकर,भावी आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
या प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने ॲड.आशिष प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून भाजपा प्रवेशा मागची भुमिका विषद केली.यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,भोकर विधानसभा मतदार संघ भोकर तालुका प्रभारी भगवानराव दंडवे,विठ्ठलनाथ डाकोरे यांनी आपल्या मनोगतातून भाजपा पक्षाची पार्श्वभूमी सांगून पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर म्हणाले की,स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विकसनशिल दुरदृष्टी व प्रयत्नांतून आमचा हा भूभाग सुजलाम सुफलाम झाला आहे.तिच विकासात्मक दुरदृष्टी खा.अशोक यांच्याकडे आहे.त्यामुळे तेच या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवू शकतात.म्हणूनच आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केला आहे.जिल्हा परिषद भोसी गटात बहुसंख्य आदिवासींचे गावे आहेत.येथील लोक अतिशय कष्ठाळू असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.त्याकरिता डोरली,बोरवाडी येथे तलाव करण्यात यावेत,त्याचं बरोबर अनेक शाळा ह्या जुन्या झाल्याने त्याना नवीन इमारतीच्या बांधकामची मान्यता मिळवून द्यावी,अशी मागणी देखील यावेळी खा.अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी केली.तर ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण म्हणाल्या की,येथील जनता व मतदारांचे प्रेम आणि आशिर्वाद आजपर्यंत ‘चव्हाण’ परिवारावर आहे.मी देखील आपली सेवा करण्यासाठी तत्पर राहिन.त्यासाठी आपली,मुलगी,भाची,नात म्हणून माझ्यावर ही आपले आशिर्वाद राहु द्यावेत,असे ही त्या म्हणाल्या.
तसेच खा.अशोक चव्हाण पुढे म्हणाले की,पिंपळढव तलावाच्या मंजूरीसाठी मला सतत ८ वर्ष प्रयत्न करावे लागलेत,त्यात यश आल्यानेच माझ्या हातून त्या तलावाच्या कामाचे नारळ फोडण्याचे भाग्य मला मिळाले.ते नारळ त्यांच्या हातून फोडण्याचे भाग्य त्यांना मिळाले नसल्यानेच अकारण विरोध करण्यात आला.आता ज्यांना मिसरुड ही फुटले नाही असे काहीजण विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत.बीआरएस ची गाडी बंद पडली आहे व काही भावी म्हणून घेणारे आपापल्या जातींचे मते विभाजण करण्यासाठी उभे राहण्याचा प्रयत्न करणार आहोत.अशा लोकांच्या भुलथापांना बळी न पडता मतांचे विभाजन होऊ न देता भाजपालाच मतदान करा. मी विकास कामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही.
खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश देण्यात आलेल्या या प्रवेश सोहळ्याच्या मंचावर बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगारानी अंबुलगेकर,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे,दिलीप देशमुख सोमठाणकर,भोसीच्या सरपंच सौ.ताराबाई प्रकाशराव देशमुख,किशोर पाटील लगळूदकर,शेख युसूफ,डॉ.फेरोज इनामदार,परमेश्वर भालेराव,विशाल माने,वेणू कोंडलवार,मिर्झा ताहेर बेग,विठ्ठल माचनवार,प्रविण भाऊ चव्हाण,ॲड‌.विनोद चव्हाण यांसह आदींची उपस्थिती होती.या सोहळ्यातून प्रकाश देशमुख भोसीकर,शिवाजी देवतुळे यांसह अनेकांनी भाजपा प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडली असून याप्रसंगी भोसी जिल्हा परिषद गटातील त्यांच्या असंख्य समर्थकांसह तालुक्यातील बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.तर या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन माजी सरपंच नागोराव दंडे यांनी केले व उपस्थितांचे आभार माजी उपसभापती मारोती झंपलवाड यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !