Sun. Dec 22nd, 2024

भोकर विधानसभेच्या प्रशिक्षण कर्तव्यावर अनुपस्थित राहिलेल्या ३ मतदान अधिकाऱ्यांविरुद्ध निघाले वॉरंट

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ८५-भोकर विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील प्रशिक्षणास अनुसूचित राहिलेल्या ३ महिला मतदान अधिकाऱ्यांविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने पोलीसांमार्फत वॉरंट काढण्यात आले असून त्या तिघी तात्काळ हजर न झाल्यास निवडणूक अधिनियम कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या व ८५-भोकर विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सुचनांची अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विविध प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहेत. दरम्यानच्या काळात दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरास कसलीही लेखी अथवा तोंडी सुचना न देता भोकर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या ३ महिला मतदान अधिकारी अनुपस्थित राहिल्या होत्या.सदरील महिला अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधला.परंतू संपर्क होऊ शकला नसल्याचे समजते.त्यामुळे त्यांनी तात्काळ कर्तव्यावर हजर व्हावे या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी भोकर पोलीसांनी त्या तिघींना वारंट तामिळ करावे असे आदेशित केले आहे.तसेच वॉरंट तामील होऊनही त्या संबंधित मतदान अधिकारी कर्तव्यावर उपस्थित न झाल्यास त्यांच्याविरुद्ध निवडणूक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रकिया करण्यात येणार आहे.अशी माहिती ८५-भोकर विधानसभा मतदार संघ निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !