Fri. Apr 18th, 2025

भोकर विधानसभा मतदार संघातील ३४३ केंद्रांसाठीचे मतदान यंत्र प्रात्यक्षिकासह झाले सज्ज

Spread the love

अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी-उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : १६-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता ८५-भोकर विधानसभा मतदार संघांतर्गतच्या ३४३ मतदान केंद्रांसाठी केंद्रनिहाय जाणाऱ्या मतदान यंत्रावर मतपत्रिका बसविणे,व्हीव्हीपॅट मध्ये उमेदवारांचे चिन्ह समाविष्ट करणे,कंट्रोल युनिटमध्ये उमेदवार संख्या निश्चित करणे,अभिरूप मतदान करून पाहणे,याच बरोबर प्रात्यक्षिकासह मतदान यंत्र सज्ज करण्याचे काम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ एप्रिल पासून शासकीय मुलांचे वस्तीगृह,किनवट रोड भोकर येथे सुरु असून अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी,असे आवाहन केले आहे.
होऊ घातलेल्या १८-व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.१६-नांदेड लोकसभा मतदार संघांतर्गतच्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील ३४३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया योग्यरित्या पार पडावी यासाठी त्या केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण वर्ग झाले आहेत.तर दि.१८ एप्रिल २०२४ ते दि.१९ एप्रिल २०२४ पर्यंत मुलांचे शासकीय वसतीगृह,किनवट रोड भोकर येथे मतदान यंत्र सज्ज(ईव्हीएम प्रिपरेशनचे) करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.यात व्हीव्हीपॅट मध्ये उमेदवारांचे चिन्ह समाविष्ट करणे,कंट्रोल युनिटमध्ये उमेदवार संख्या निश्चित करणे,बॅलट युनिटवर मतपत्रिका बसविणे,अभिरूप मतदान करून (मतदानाचे प्रात्यक्षिक करून पाहणे)पाहणे,तसेच संबंधित केंद्रांच्या ठिकाणाचे नाव लिहलेली चिठ्ठी(ऍड्रेस टॅग) लावून मतदान यंत्र सील करण्याचा समावेश आहे.
तसेच राखीव मतदान यंत्रे देखील याच पद्धतीने तयार करण्यात आली आहेत.दि.१८ एप्रिल २०२४ रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी याठिकाणी भेट देऊन येथील सदरील कामाची व व्यवस्थेची पाहणी केली आहे.याच बरोबर उपरोक्त दोन्ही दिवसी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी,पत्रकार यांनी या ईव्हीएम सिलिंग प्रक्रियेच्या ठिकाणी भेट देऊन स्वतः अभिरूप मतदान करून पाहिले आहे.ईव्हीएम सिलिंगचे हे काम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे,मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर,अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या समन्वयातून ३८ टेबलवरील मतमोजणी पर्यवेक्षक(क्षेञिय अधिकारी),मतमोजणी सहाय्यक,मास्टर ट्रेनर यांनी केले असून मतदान यंत्र तयार करण्याचे काम पुर्ण केले आहे.मतदानासाठी हे मतदान यंत्र सज्ज करण्याच्या दरम्यान पाच टक्के मतदान यंत्रे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या समक्ष यादृच्छिक पद्धतीने निवडून त्यावर १ हजार मतदान करून पाहण्याची प्रक्रिया घेण्यात आली आहे.या कामी भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर,मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी,अव्वल कारकून,तलाठी,महसूल सहाय्यक, शिपाई कोतवाल,पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी व इतर सर्व विभागांच्या एकूण ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी-उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी
मतदान यंत्रांविषयी नको त्या शंका-कुशंका घेऊन काही लोक अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.अशा प्रकारच्या अफवांवर कदापिही विश्वास ठेऊ नये. कारण मतदान यंत्र हे परिपुर्ण व कसलाही दोष नसणारे आहेत. हे दर्शविण्यासाठी तथा खात्री व्हावी यासाठीच राजकीय पक्ष प्रतिनिधी,पत्रकार व काही नागरिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांच्या स्वहस्ते अभिरूप मतदान करून पाहिले आणि दाखविले (मतदानाचे प्रात्यक्षिक) जाते.त्याच अनुषंगाने ते प्रात्यक्षिक करून दाखविले गेले आहे.मतदानासाठी सदरील मतदान यंत्र सज्ज करण्यात आली आहेत.तसेच केंद्रनिहाय मतदान करण्यासाठी मतदारांची कसलीही गैर सोय होऊ नये व त्यांना आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे? हे पाहता यावे म्हणून बीएलओ मार्फत मतदार माहिती चिठ्ठी घरपोच देण्यात येत असून अधिकाधिक मतदारांनी दि.२६ एप्रिल २०२४ रोजी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी,असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी नाही केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !