मारेगाव(खालचे)येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ नांदेड येथे प्रचंड धरणे आंदोलन संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : किनवट तालुक्यातील मारेगाव (खालचे) येथील निष्पाप मुलींच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटूंबियांचे आर्थिक मदतीसह पुनर्वसन करण्यात यावे या मागण्यासाठी व त्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना व समाजसेवींनी दि.१० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड येथे एक दिवसीय प्रचंड धरणे आंदोलन केले असून उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना पाठविले आहे.
किनवट तालुक्यातील मारेगाव (खालचे) येथील निरपराध तीन मुलींचा पाण्यात बुडवून खून करणार्यात आला.सदरील तिहेरी हत्याकांडातील आरोपींवर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतू सदरील गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्यांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्या पीडित कुटूंबियांना तात्काळ संरक्षण देण्यात येऊन किनवक येथे पुनर्वसन करण्यात आले पाहिजे.तसेच त्या पीडीत कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी. मयत मुलींचे पीडीत वडील देवीदास कांबळे यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.तसेच डौर ता.अर्धापूर येथील उपसरपंच महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. त्याचबरोबर मरवाळी ता.नायगाव येथील ५ वर्षाच्या चिमकुलीवर आत्याचार करणार्या आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी,यासह आदी मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटना व सेवाभावीच्या वतीने दि.१० जून २०२४ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपरोक्त घटनांच्या निषेधार्थ तथा मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील विविध घटनेतील पीडितांना न्याय देण्यात यावा यासाठी एकदिवसीय प्रचंड निषेध धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
धरणे आंदोलनाच्या समारोपाअंती एका जंम्बो शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेतली व त्यांच्या मार्फत उपरोक्त मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.सदरील धरणे आंदोलनात व शिष्टमंडळात सतीश कावडे, पंडित वाघमारे,डी.डी.वाघमारे,परमेश्वर बंडेवार,सूर्यकांत तादलापूरकर,नितीन तलवारे,सुभाष आलापूरकर,नारायण सोमवारे,द्रोपदाताई कांबळे,कॉ.गंगाधर गायकवाड,डॉ. शंकरराव गडमवार,यशोदाताई शेळके,शिवाजी बोयणर,शंकर गायकवाड,देवीदास इंगळे,विलास मस्के,संजय कांबळे, भीमराव दिपके,आनंद वंजारे,डॉ.विठ्ठल भंडारे,डॉ.हरी बोयाळ, अक्षय बोयाळ,भीमराव बैलके,शिवाजीराव नुरूंदे,गोपीनाथ सूर्यवंशी,प्रभाकर वाघमारे,यादवराव वाघमारे, देवीदासराव लिंगायत,संभाजी शिंदे,नागराज आईलवार,सुरेश कांबळे, ज्ञानेश्वर डोम्पले,विजय रणखांब,दत्ता जोगदंड,आकाश सोनटक्के,कॉ.अंबादास भंडारे,कॉ.उज्ज्वल पडलवार,कॉ.लता गायकवाड, छायाताई मोरे,महानंदा लोंढे,पीडीत महिला उपसरपंच याचबरोबर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, अण्णा भाऊ साठे क्रांती सेना,मातंग अस्मिता संघर्ष सेना, संविधान बचाव आंदोलन,सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी,भाकपा (माले),रिपाई खोब्रागडे, लोकस्वराज्य आंदोलन,लसाकम,गोर बंजारा सेना,बिसेप, अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद,अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्तांची संघटना,बहुजन भारत पार्टी यांसह विविध सामाजिक संघटनांचे,पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला आणि युवकांचा सहभाग होता.