Thu. Dec 19th, 2024
Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेण्यासाठी हदगाव तालुक्यातील एका गावातून ये-जा करणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन तिला मॅजिक ऑटो रिक्षा मध्ये बसवून भोकर शहरापासून काही अंतरावर असलेल्या दोन ठिकाणी नेऊन तिच्या मनाविरुद्ध दोघांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केला.सदरील गंभीर घटना दि.१७ ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी रात्री उशिरा भोकर पोलीसांत त्या दोघांविरुद्ध बलात्कार केल्याचा व पोक्सो अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी भोकर येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेण्यासाठी ये-जा करते.तिचा चुलता एका व्यक्तीचे शेत बटाईने करतो त्याचा पुतण्या असलेल्या निखिल चंदापूरे(२०) रा.पिंपळगाव ता.हदगाव यास ती ओळखते. तसेच कधी कधी ज्या मॅजिक ऑटो रिक्षाने शाळेसाठी भोकर येथे ती ये-जा करते त्या ऑटो रिक्षाचा चालक असलेल्या सुदर्शन जंगेवाड(१९)रा.राजवाडी ता.हदगाव यास ही ती ओळखते.दि.१६ ऑक्टोबर २०२४ पासून घटक चाचणी परीक्षा सुरू झाली असल्याने परीक्षा देण्यासाठी दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी ती भोकर येथे आली होती. घरच्यांनी सांगितलेले काही कामे आटोपून गोकूळनगर येथून किनवट रस्त्याने ती शाळेकडे जात असतांना दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान सुदर्शन जंगेवाड व त्याचा मित्र माधव चंदापुरे हे दोघे तो मॅजीक ऑटो रिक्षा घेऊन पाठीमागून आले‌.यावेळी निखील चंदापुरे हा त्या ऑटो रिक्षातून खाली उतरला व ओळखीचा फायदा घेत त्याने तिचे तोंड दाबुन बळजबरीने तिला ऑटो रिक्षा ढकलले. त्यानंतर सुदर्शन जंगेवाड यांने त्याची ती मॅजीक ऑटो रिक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-महाराणा प्रतापसिंह चौक मार्गे भोकर शहरापासून जवळच असलेल्या भोकर-नांदेड रस्त्यावरील गुडा महादेव मंदिर पर्यटन स्थळ परिसरा समोरील डाव्या बाजुच्या रस्त्याने आतमध्ये नेली आणि एका ठिकाणी थांबविली.यावेळी सुदर्शन जंगेवाड हा त्या ऑटो रिक्षा बाहेर गेला व निखील चंदापूरे याने जबरदस्तीने तिच्या मनाविरुध्द शारिरीक संबंध केला.

थोड्या वेळाने त्याच ऑटो रिक्षा मध्ये तिला बसवून या दोघांनी भोकर शहरालगत मुदखेड रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ नेले व तेथील टेकडीवर नेऊन परत तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केला.अशा अवस्थेत या पिडीत शाळकरी मुलीस काय करावे समजेनासे झाले होते. एका फरसान मार्ट समोर ती आली व एका ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईल वरुन तिने वडीलांशी संपर्क साधला.वडील तात्काळ भोकर येथे आले व तिला घेऊन घरी गेले.यावेळी घडलेल्या त्या अमानुष व निंदनिय घटनेविषयी तिने कुटूंबियांना सांगितले.कुटूंबियांसोबत ती सायंकाळी परत भोकर येथे आली व पोलीस ठाणे गाठले आणि उपरोक्त आशयानुसार तिने रितसर फिर्याद दिली.पिडीत अल्पवयीन शाळकरी मुलीच्या त्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(एम),६५ (१),१३७(२),४९,व बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,१७ प्रमाणे त्या दोघांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला.यानंतर भोकर पोलीसांनी तात्काळ त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.तसेच त्यांना दि.१८ ऑक्टोबर २०२४ रोजी भोकर न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या पुढील अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !