आज भोकर येथे समर्थ अर्बन को.ऑ.बँकेचा पहिला वर्धापन दिन साजरा होणार!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अवघ्या १ वर्षाच्या सेवाकार्याने सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.भोकर जि.नांदेड या बँकेचचा पहिला वर्धापन दिन आज दि.१ डिसेंबर २०२४ रोजी भोकर येथे भव्य दिव्य सोहळ्यातून साजरा होणार असून सर्व संबंधित व हितचिंतकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशू संवर्धन संभाजी तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील १५ सहकारी संचालक एकत्र येऊन मागील वर्षी समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.भोकर या सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली.केवळ दीड ते महिन्यात उद्दीष्टापेक्षा अधिकचे शेअर जमा केली व ही बँक जनसेवेत रुजू झाली.अपेक्षा,सुरक्षा,सेवा,हमी व विश्वास ही ब्रीद घेऊन सुनियोजनातून सर्व सभासद,ठेवीदार,खादेतार, कर्जदार व हितचिंतकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या या बँकेला १ वर्ष पुर्ण होत असून दुसऱ्या वर्षात पदार्पण होत आहे.या औचित्याने आज रविवार,दि.१ डिसेंबर २०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय,मंजुळा नगर,नांदेड रोड,भोकर येथे सत्यनारायणाच्या पुजनाने पहिल्या वर्धापन दिनाचा सोहळा संपन्न होणार असून तीर्थ प्रसाद व चहा पान कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यास बँकेच्या प्रगतीत सातत्यपूर्ण सहकार्य करणाऱ्या सर्व भागधारक, ग्राहक,खातेदार,कर्जदार व हितचिंतकांनी अगत्याने उपस्थित रहावे,असे विनंतीपर आवाहन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,उपाध्यक्ष आनंदराव पाटील ढवळे चिंचाळकर,शाखाधिकारी प्रविण रामराव सुर्यवंशी यांसह सर्व सन्माननिय संचालक मंडळाने केले आहे.बँकेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने खुप खुप हार्दिक शुभेच्छा!