भोकर तालुक्यातील काही कष्टकरी शेतकऱ्यांना ‘उजेडाची साथ’ देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविणार!
सामाजिक नेते नामदेवराव आयलवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे उद्या मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सामाजिक नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस विविध समाजसेवी उपक्रम व कार्यक्रमांनी मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षी देखील दि.७ जुलै रोजी गणराज रिसोर्ट(मंगल कार्यालय), भोकर येथे विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री अपरात्री आपल्या शेतात कष्ट करण्यासाठी अंधारात जाणाऱ्या भोकर तालुक्यातील प्रत्येक गावांतील अल्पभूधारक व होतकरू अशा १० शेतकऱ्यांना उजेडाची साथ देण्यासाठी ‘टॉर्चचे’ वाटप करण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपण,पत्रकारांचा सन्मान यांसह आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन आयलवाड मित्रमंडळाने केले आहे.
गोल्ला गोलेवार यादव समाजाचे तथा नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज नेते सेवाभावी व्यक्तीमत्व नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.यावर्षी देखील रविवार,दि.०७ जुलै २०२४ रोजी गणराज रिसोर्ट (मंगल कार्यालय),भोकर येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.त्याच अनुषंगाने वृक्षारोपण,निर्भिड व समाजसेवी पत्रकारांचा सन्मान आणि विशेष बाब म्हणजे अंधारात कष्ट करणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक गावातील होतकरू अल्पभूधारक १० शेतकऱ्यांना उजेडाची साथ देण्यासाठी ‘टॉर्चचे’ चे वाटप करण्यात येणार आहे.
राजकारणात वावरताना समाजकारणाला अधिक महत्त्व देत अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले नामदेव आयलवाड यांची संपुर्ण नांदेड जिल्ह्यात एक समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे.एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.प्रतिवर्षी त्यांचा वाढदिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील मित्रमंडळ व कार्यकर्त्यांकडून दि.७ जुलै २०२४ रोजी गणराज रिसोर्ट भोकर येथे नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.तरी सदरील कार्यक्रमास शेतकरी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते,मित्रमंडळी व स्नेहिजणांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन नामदेवराव आयलवाड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.