Sun. Dec 22nd, 2024

सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड यांना दिली धमकी

Spread the love

भोकर पोलीसात एका विरुद्ध गुन्हा दाखल

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील ओबीसी नेते,स्मार्ट व्हिलेज हाडोळीचे प्रणेते तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड यांना अश्लील शिवीगाळ करुन जिवेमारण्याची दिल्या प्रकरणी एका विरुद्ध भोकर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा ओबीसी समाज बांधवांसह अनेकांतून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव गंगाधर अमृतवाड रा. हाडोळी ता.भोकर हे दि.२७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता आपल्या कारने सपत्नीक नांदेडला जात असतांना भोकर नांदेड महामार्गावरील वाकद शिवारात दशरथ पाटील कदम रा.हस्सापूर ता.भोकर यांनी अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच दशरथ पाटील कदम यांनी त्यांच्या फेसबुक समाजमाध्यम अकाऊंटवरुन मराठा व ओबीसी आरक्षण संदर्भाने माधव अमृतवाड यांच्या विषयी खालच्या पातळीतली आक्षेपाहर्य पोस्ट टाकून अपमानित केले.

सदरील प्रकरणी माधव अमृतवाड यांनी दि.२८ जानेवारी २०२४ रोजी भोकर पोलिसांत रितसर फिर्याद दिली. यावरुन दशरथ पाटील कदम यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०७ प्रमाणे धमकी दिल्याचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.विकास आडे हे करत आहेत.
तसेच ही घटना निषेधार्य असल्याने असंख्य ओबीसी बांधवांसह आदींनी या घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला असून त्या आरोपीस तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी समाज नेत्यांनी दिला आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !