Thu. Apr 10th, 2025

पाणंद रस्ते,शेत रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा-तहसीलदार विनोद गुंडमवार

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी व माल वाहतूक सुरळीतपणे करता यावी यासाठी पाणंद रस्त्यासह इतर रस्ते तयार करण्यात आले आहेत.परंतू काही ठिकाणी त्या रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे व काही रस्ते अडविण्याणत आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.यातून त्या शेतकऱ्यांची सुटका होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला असून शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते,शेत रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे,असे आवाहन भोकर चे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.
राज्य सरकार हे राज्यातील शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजना राबवित आहे.त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कृती आराखडा आखला असून यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतातील माल सुरळीतपणे नेता यावा यासाठी पाणंद रस्ते,शेत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम राबविण्यात यावी असा निर्णय घेतला आहे.त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद केलेले गाडी रस्ते,पाणंद रस्ते, शिवरस्ते,शेतरस्ते,पायवाट लोकसहभागातून मोकळे करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसाचा कृती कार्यक्रम आयोजित केला आहे.दि.३१ मार्च २०२५ दरम्यान ही विशेष मोहीम राबविली जाणार असून दि.२५ जानेवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांकडून याविषयी अर्ज मागविण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर दि.२६ जानेवारी २०२५ ते दि.१४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नोडल अधिकारी व पथकाद्वारे स्थळ पाहणी केली जाणार आहे.तर दि.१५ फेब्रुवारी २०२५ ते दि.३१ मार्च २०२५ कालावधीत हे सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाव तेथे दफनभूमी होणार!

तालुक्यात ज्या गावात दहन व दफनविधीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही,त्याठिकाणी तशी व्यवस्था करण्यासाठी शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे.दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्या गावात गायरान जमीन उपलब्ध नसल्यास परंपरेप्रमाणे वहिवाटीत असलेली किंवा नवीन खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. दि.३० एप्रिल २०२५ पर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात येणार असून सदरील मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन महसूल विभागाला सहकार्य करावे,असे आवाहन भोकर चे तहसीलदार गुंडमवार यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !