विशाल गडावरील मुस्लिम धर्मीय प्रार्थना स्थळाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!
भोकर येथील विविध पक्ष,संघटना व मुस्लिम बांधवांनी ‘त्या’ घटनेच्या निषेधासह केली ही मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी गेलेल्या युवकांनी गजापूर येथील मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थना स्थळाचे विद्रुपीकरण करुन पवित्र ग्रंथाची जाळपोळ केली आणि घरांची देखील तोडफोड केली.ही बाब मानवतेला काळीमा फासणारी व निषेधार्थ असल्याने भोकर येथील विविध पक्ष,संघटना व मुस्लिम बांधवांनी दि.१९ जुलै रोजी तहसिल कार्यालय भोकरे येथे सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.तसेच हे दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटांविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनांद्वारे राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे तहसिलदार यांच्या मार्फत केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या युवकांचा मोठा जत्था विशालगडावर जात असतांनाच वाटेत असलेल्या गजापूर येथील मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाचे त्या जत्थ्याने विद्रुपीकरण केले.तसेच अनेक घरांची तोडफोड केली.सदरील घटना ही अमानुष असल्याने दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि.१९ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय भोकरच्या प्रांगणात राष्ट्रीय काँग्रेस कमेटी,एम.आय. एम.,बी.आर.एस.,आम आदमी पार्टी,मुस्लिम लीग,भिम टायगर सेना,युवा पॅंथर,समाजवादी पार्टी यांसह आदी पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव एकत्र आले.यावेळी जमलेल्या सर्वांनी ‘त्या’ अमानुष घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला.तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोक्त मागणीचे निवेदन तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या मार्फत पक्ष आणि संघटनांच्या वतीने पाठविण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने बी.आर.एस.चे नेते नागनाथ घिसेवाड,एम. आय.एम.चे नेते बाबा खान पठाण,जुनेद पटेल,राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तौसिफ इनामदार,भिम टायगर सेनेचे मिलिंद गायकवाड,जुबेर मौलाना,खालेद मौलाना,आम आदमी पार्टीचे सय्यद अल्मास,आतीश सोनूले यांसह आदींनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.तर सदरील निषेध स्थळी शेख रज्जाक प्रेसवाले,नईम तळेगावकर,पत्रकार अहेमद करखेलीकर,अब्दूल हकिम भोकरकर,पत्रकार एजाज कुरेशी,करीम करखेलीकर, निजाम बाबा,मन्सूर खान पठाण कोलगावकर,सय्यद जुनेद, आशु भाई,अफरोज पठाण,आतिफ भाई गिरणीवाले,शेख साबीर,शफी इनामदार,इम्तियाज इनामदार,प्रल्हाद सुकळेकर, युनूस लाला,अब्दुल नुफेद,अब्दुल सामी,सय्यद नासेर,आमेर पटेल,अब्दूल अजिम,सय्यद जब्बार यांसह असंख्य मुस्लिम बांधवांची उपस्तिथी होती.तसेच पो.नि.सुभाषचंद्र मारकड,पो. उप.नि.राम कराड,जमादार नामदेव जाधव,गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.