परभणी येथील प्रतिकात्मक संविधान शिल्प विटंबनेचा भोकर मध्ये अनुयायींनी केला तीव्र निषेध !
भोकर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने ही करण्यात आला निषेध व्यक्त व देण्यात आले निवेदन…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : परभणी शहरात असलेल्या विश्ववंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या काचेतील प्रतिकात्मक संविधान शिल्पाची विटंबना करुन पुतळ्यास ही एका माथेफिरू विकृताने दगड मारल्याची निषधार्य दुर्दैवी घटना दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.या घटनेने तमाम भारतीय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अनुयायींच्या आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखल्या आहेत.सदरील निषेधार्य घटनेचे पडसाद परभणीसह राज्यात व भोकर मध्ये ही उमटले असून येथील आंबेडकरी समाज,विचार अनुयायी आणि विविध पक्षिय कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.तसेच हे कृत्य करणाऱ्या विकृताविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह विभागास तहसिलदार भोकर यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
परभणी शहरातील रेल्वे स्थानक व जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात विश्व भुषण वंदनिय डॉ.डाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा आहे.या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान शिल्प प्रतिकृती एका काचेच्या फ्रेम मध्ये ठेवण्यात आलेली आहे.मंगळवार, दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी एका विकृत मनोवृत्तीच्या इसमाने पुतळ्यास दर गड मारले व ती काचेची फ्रेम तोडून आतील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधुस केली.यावेळी उपस्थितांनी त्यास चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले.परंती ही घटना अनेकांच्या भावना दुखविणारी व निषेधार्य असल्याने याचे पडसाद परभणी शहर,जिल्हा व राज्यात उमटले.भोकर शहर व तालुक्यातील असंख्य नागरिक,आंबेडकर समाज,आंबेडकरी विचार अनुयायी आणि विविध पक्षिय कार्यकर्त्यांच्या ही भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे सदरील घटनेचा भोकर मध्ये ही दि.११ डिसेंबर २०२४ रोजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच निषेधाचे व त्या माथेफिरु विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाकडे तहसिलदार भोकर यांच्या मार्फत सकाळी ११: ०० वाजता पाठविण्यात आले.सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी व निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळात डॉ.साईनाथ वाघमारे,पत्रकार जयभीम पाटील,डॉ विजयकुमार दंडे,डॉ.प्रज्वलीत सोनकांबळे,पत्रकार सुंधाशू कांबळे,डॉ.कैलास कानिंदे,गौतम कसबे,सुलोचना ढोले,विक्रम क्षिरसागर,कपील कांबळे,सिद्धार्थ जाधव,संदीप गायकवाड, शंकर कदम,मनोज शिंदे,संतोष डोंगरे,यशोदाबाई महाबळे, द्वारकाबाई कांबळे,आनंद ढोले, दयानंद गुंडेराव,दलित डोंगरे, अविनाश गायकवाड,सतिश जाधव,भिमराव हनवते,साहेबराव वाहुळकर,गोविंद थोरात,राजेश वाघमारे,प्रशांत कानडे,सचिन देवाले,साहेबराव हनमंते,गणेश वाघमारे,गंगाधर भवरे,नागसेन दुधारे,मिलिंद दुधारे,आशिष वाघमारे,आदित्य वाघमारे,तथागत गाडेकर,सतिश गुंडेराव,सुमित खंडेलोटे,मनोज मोरे,भागवान जाधव,कैलास कदम, अभिनंदन दांडगे,वंसंत जाधव, शाक्यशासन पाटील,नरेंद्र मोरे,बंटी वाघमारे,ईर्शाद ईनामदार, शन्न्नुभाई शेरवाले,जुनेद पटेल,मिर्जा आक्रम,दिगांबर कांबळे, विश्वजीत जळपतराव यांसह आदींचा समावेश होता.
भोकर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने ही करण्यात आला निषेध व्यक्त व देण्यात आले निवेदन…
भोकर : भोकर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व प्रतिकात्मक संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व दोषी माथेफिरू विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहविभागास तहसिलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले.सदरील निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार,जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,युवा नेते संदिप पाटील गौड,शहराध्यक्ष तौसिफ इनामदार,बाबाखान पठाण,रज्जाक शेठ,आरेफ इनामदार, अफरोज खान इनामदार,साबेर शेख,आदिनाथ चिंताकुंटे,सम्राट हिरे,प्रल्हाद सुंकळेकर,सुरेखा माळे यांसह आदींचा समावेश होता.