Thu. Apr 10th, 2025

स्वराज विकास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चा नांदेड मध्ये लवकरच शुभारंभ !

Spread the love

डॉ.शिल्पा पाटील किन्हाळकर यांची बँकिंग क्षेत्रात दमदार एंट्री…

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : स्वराज विकास अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड ह्या बँकिंग संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाने नुकतीच नोंदणी पुर्णत्वास  आली असून सदरील संस्थेच्या मुख्य शाखेचा लवकरच नांदेड शहरात शुभारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी दिली आहे.भोकर येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर हे मुख्य प्रवर्तक,तर मैनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांच्या कन्या डॉ.शिल्पा पाटील किन्हाळकर व अन्य ११ संचालक असलेल्या स्वराज विकास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.नांदेड या बँकेची नोंदणी नुकतीच पुर्णत्वास आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.जिचा नोंदणी क्रमांक : एनएनडी/आरएसआर/ (ओ)८२०/२०२५ असा असून या संस्थेची नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,नांदेड चे जिल्हा उपनिबंधक योगेशकुमार बाकरे यांनी मुख्य प्रवर्तक शिवाजी पाटील किन्हाळकर यांना प्रदान केले आहे.यावेळी संस्थेचे संचालक सुधीर इंगोले,जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.उपरोक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण ‘साधन संपत्ती संस्था’ असून उपवर्गीकरण ‘कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था’ आहे.छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा कर्तव्य बजावणाऱ्या डॉ.शिल्पा पाटील किन्हाळकर यांची मैनेजिंग डायरेक्टर पदावरुन या संस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात दमदार एंट्री झाली असून त्यांच्या सुनियोजनातून सदरील बँकेच्या मुख्य शाखेचा नांदेड शहरात लवकरच शुभारंभ होणार आहे.सदरील बँकेचे कार्यक्षेत्र नांदेड जिल्हा असल्याने जिल्हा शाखेच्या शुभारंभानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका स्थानी उप शाखा स्थापन केल्या जाणार आहेत.या संस्थेचा मुख्य उद्देश ठेवीदाराचे हित जपणे हा असून सभासदांमध्ये सामाजिक व आर्थीक प्रगती साधणे व सदर प्रगती सहकाराच्या तत्वानुसार स्वतःसाठी व एकमेकांसाठी एकमेकांच्या मदतीद्वारे अर्थ व्यवहार करणे असा आहे.याच माध्यमातून १)सभासदांत काटकसर,स्वावलंबन व सहकार्याची भावना वृध्दिगत करणे.२) सभासदाकडून ठेवी स्विकारणे,त्याचा विनियोग कर्ज देणे अथवा गुंतवणुक करणे.३) कर्जाची उभारणी करणे.४) सर्व प्रकारचे बॉण्डस कर्ज रोख वचन चिठ्या व इतर प्रकारच्या मौल्यवान वस्तु ठेवीच्या स्वरुपात अथवा सुरक्षित तिजोरीत ठेवण्यासाठी स्विकारणे.५) सुरक्षित तिजोरी घर (सेप डिपॉझीट व्हॉल्ट) व तनुषगिक सेवा उपलब्ध करुन देणे.६) सुरक्षा पत्रे व रोख रकमाची देवाण – घेवाण करणे,पाठविणे.असा उद्देश असून सोने तारण कर्ज,पिग्मी ठेव,वाहन कर्ज यासह आदी सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत.अशी माहिती सदरील बँकेचे मुख्य प्रवर्तक शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !