Fri. Apr 18th, 2025

भोकर पोलीस ठाण्याचा पदभार आता पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्याकडे

Spread the love

*तर पदोन्नतीने पो.नि.नानासाहेब उबाळे हे सहाय्यक पोलीस उपायुक्त सोलापूर ग्रामीण पदभार घेण्यासाठी जाणार…
*आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केली १० पोलीस निरीक्षकांची बदली

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सन २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून यात नांदेड वाहतूक शाखेचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांची भोकर पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर भोकर येथील सेवारत असलेले पो.नि.नानासाहेब उबाळे हे पदोन्नतीने सहाय्यक पोलीस उपायुक्त सोलापूर ग्रामीणचा पदभार घेण्यासाठी जाणार आहेत.
केंद्र व राज्य निवडणुक आयोगाने आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर महसूल,पोलीस व विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत.त्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील १० पोलीस निरीक्षक,२६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे दि.११ जानेवारी रोजी आदेश पत्र निर्गमित केले आहे.त्या १० पोलीस निरीक्षकांच्या बदली आदेशात नामांकित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना जिल्हा विशेष शाखेतील सुरक्षा विभाग अशी मोठी जबाबदारी देण्यात आली असून सर्वात जास्त नियुक्त्या गुरुद्वारा सुरक्षा विभागात करण्यात आल्या आहेत.
तर शहर वाहतुक शाखा-२ इतवारा ठाण्याचे पोलीस निरिक्षक साहेबराव लक्ष्मण गुट्टे,शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन बाळासाहेब भोसले,डायल ११२ चे पोलीस निरीक्षक नारायण दुर्गादास सावणे या तिघांना जीपीयु(गुरुद्वारा सुरक्षा पथक) येथे पाठविले आहे. तसेच बिलोलीचे पोलीस निरीक्षक गणेश माणिकराव सोंढारे यांना सी-४७ किनवट येथे पाठविण्यात आले आहे.जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शामसुंदर मधुकरराव टाक यांना बिलोली पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.तर शहर वाहतुक शाखा-१ वजिराबाद चे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र नारायण मारकड यांना भोकर पोलीस ठाणे येथे पाठविण्यात आले आहे.याचबरोबर भाग्यनगर येथील पोलीस निरीक्षक सुर्यमोहन नारायणराव बोलमवाड यांना शहर वाहतुक शाखा-१ वजिराबाद येथे नियुक्ती दिली असून माहुरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन भास्करराव काशीकर यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती दिली आहे.इतवाराचे ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बापुराव तांबे यांना जिल्हा विशेष शाखेत (डीएसबी) नियुक्ती दिली आहे.यात सर्वात महत्वाची जबाबदारी वजिराबादचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्यावर देत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना जिल्हा विशेष शाखेत सुरक्षा विभाग दिला आहे.
भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले पो.नि.नानासाहेब उबाळे यांची गत ४ महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस उपायुक्त पदी पदोन्नती झाली व त्यांना सहाय्यक पोलीस उपायुक्त सोलापूर ग्रामीणचा पदभार देण्यात आला.परंतू त्यांनी काही प्रशासकीय कारणास्तव भोकर पोलीस ठाण्याचा पदभार सोडला नव्हता.तसेच अवघ्या काही महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार आहेत.पो. नि.नानासाहेब उबाळे यांनी भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात उत्तम कर्तव्यसेवा बजावली आहे.परंतू निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी निवडणूकींची आदर्श आचारसंहिता लागण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी जाणे प्रत्येक अधिकाऱ्यांना अनिवार्य असल्याने आता नानासाहेब उबाळे हे सहाय्यक पोलीस उपायुक्त पदाचा पदभार घेण्यासाठी सोलापूर येथे जातील व या पदावरुन ते सेवानिवृत्त होतील असे समजते.तर त्यांच्या जागेचा पदभार नांदेड येथून येणार असलेले पो.नि.सुभाचंद्र मारकड हे घेतील असे समजते.
भोकर पोलीस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी येत असलेल्या पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत व उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावून सोलापूर येथे जात असलेल्या सहाय्यक पोलीस उपायुक्त नानासाहेब उबाळे यांना पुढील सेवाकार्यासाठी मनापासून शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !