शंकरसिंह ठाकुर यांचा संघर्षमय जीवन प्रवास;वार्ताहर ते मुख्य संपादक पर्यंतची घौडदौड
संपादक शंकरसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त संपादक मारोती शिकारे यांचा प्रासंगिक लेख वाचकांसाठी… संपादक
अंबुज प्रहार विशेष
आजकाल बरीच माणसं असतात,अनेक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळ्या परिचा असतो,परंतु काही माणसे असे असतात की…केलेले काम हे अंतकरणातूनच करत असतात.म्हणूनच तयार होतं नेतृत्व,जुळतं जिव्हाळा आणी अंतकरणाचे नातं.पत्रकारितेतून केलेले समाज कार्य व अंत:करणातून जिव्हाळ्याचे नाते जपणारे निर्भीड पत्रकार तथा दैनिक वीर शिरोमणी चे मुख्य संपादक म्हणजेच शंकरसिंह ठाकुर होत.
खरं तर समाजभान हरवलेल्या लोकांना ताळ्यावर आणणारे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता होय.यामधील देशातील सर्व क्षेत्रात वावरणा-या लोकांना शाश्वत विकासाच्या प्रवाहात आणत लोकशाहीच्या माध्यमातून कार्यतत्पर ठेवण्यासाठी चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमाची भूमिका खांद्यावर घेऊन जीवनावली पथावर मार्गस्थ होतांना निस्वार्थ जगणे काहींना जमते.प्रापंचिक जीवनात पैसा महत्त्वाचा असून सुद्धा त्याच्या पाठीमागे न लागता देशहितासाठी व लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन समाज जागृतीचा वसा घेऊन सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी अविरत धडपडणारे ही क्वचितच असतात. स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योतर काळापासून अनेक पत्रकारानी अतिशय तळमळीने कार्य केलेले आहे.त्यांचाच आदर्श घेऊन वर्तमान काळात आपल्या पध्दतीने सातत्याने न्यायीक पत्रकारीता काहीजण करत आहेत.आज अशाच एका पत्रकाराच्या कार्याचा आढावा आपण घेत आहोत.
शंकरसिंह ठाकुर यांचा जन्म दि.०३ मार्च १९७० रोजी सामान्य कुटुंबात मौ.पांगरा(तळ्याचे)ता.कंधार येथे झाला.शिक्षण पदवी पर्यंत झाले.लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा छंद होता. शंकरसिंह ठाकुर दादांचा जीवन प्रवास एकदम संघर्षमयच म्हणावा लागेल…आई-वडिलांचे छत्र जोपर्यंत दादांच्या डोक्यावर होते,तोपर्यंत दादा एकदम राजकुमारा सारखे वागायचे.शाळा कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींचा गराडा त्यांच्या भोवती जमा व्हायचा…सुंदर दिसणाऱ्या राजकुमाराला त्यांच्या पेक्षाही सुंदर अशी सर्व गुणसंपन्न उच्च शिक्षीत घराण्यातली राजकुमारी (गिता शंकर सिंह ठाकुर) भेटली.सुखी संसार अगदी व्यवस्थित चालत होता…परंतु काही दिवसात आई-वडिलांचे छत्र हरवले..तेव्हा चालू झाला दादाचा संघर्षमय जीवन प्रवास…दादांना सहकारी बँकेत नोकरी होती.कालांतराने तीही नोकरी गेली.पुढे काय करणार, संसाराचा गाडा हाकण्यासाठी काहीतरी करावेच लागेल.छोटी-छोटी लेकरं आई-बाबांच्या चेहऱ्याकडे पाखरासारखे पहात बसायचे. त्याचवेळी दादा जीवनात खचून न जाता संघर्षमय जीवन प्रवासाला खंबीरपणे उभे राहिले.जीवनात यशस्वी होणारच, म्हणून त्यांनी पत्रकारिताक्षेत्र निवडले आणि त्यात ते यशस्वीही झाले.पत्रकारिता करीत असताना,दादांची आणि माझी अचानक भेट झाली.त्याचवेळी दादांच्या अंगी असणारे गुण मी हेरले.त्यांचे हळवे मन,बोलण्याची शैली,क्षणात त्यांची ताठर भूमिका…मग आमची मैत्री झाली.मैत्रीचे रूपांतर बंधू प्रेमात झाले…तेंव्हापासुनच मी त्यांना आदराने दादा म्हणून बोलू लागलो.
पत्रकारिता करीत असताना आम्ही माहिती अधिकार समिती, जनता माहिती अधिकार समिती,विविध सामाजिक संघटना, मा.अतुल भाऊ खूपसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनशक्ती संघटनेमध्ये काम केले व भ्रष्ट अधिकारी यांना धारेवर धरले आणि त्यांच्या नाकी नऊ आणून सोडले होते. पत्रकारितेतील कार्य व सामाजिक कार्य याची नोंद घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा “आदर्श पत्रकारिता पुरस्कार” आम्हा दोघांना दि.२२ जानेवारी २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथे प्रदान करण्यात आला.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने राज्य चिंतन मेळावा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष),प्रमुख पाहुणे म्हणून मा.सचिन पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण),मा.प्रताप दिघावकर (सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक तथा सदस्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन),तसेच धनंजय वाव्हळ,सलमान तांबोळी,प्रशांत गरुड, संजय गंगावणे,प्रिया तुळजापूरकर व “तुज्या माज्या संसाराला आणि काय हवं !” या मराठी मालिकेतील कलाकार,राष्ट्रीय, राज्य,जिल्हा,तालुका सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदरील कार्यक्रम रविवार,दि.२१ आगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता पवार लॉन्स,मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळ,हिरावाडी पंचवटी नाशिक येथे पार पडला.या कार्यक्रमात सामाजिक व पत्रकारांच्या अनेक विषयावर विचार विनिमय करण्यात येऊन अनेक ठराव संमत करण्यात आले.यावेळी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शंकरसिंह ठाकुर यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली,तर नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी व नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी आम्हा दोघांना विराजमान करून निवडीचे पत्र मा. विजयजी सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष),मा.सचिन पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यापूर्वी शंकरसिंह ठाकुर (दादा ) व मी मिळून पत्रकार संघात व पत्रकारितेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.दादांच्या ह्या कार्यकुशलतेमुळे दादांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात काम करीत असताना “एक घास मायेचा” या उपक्रमाखाली अनाथांना,वृद्धांना,कुष्ठरोगी रुग्ण यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दिपवाळी फराळ वाटप करणे,गरीब व होतकरू मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करणे, झाडे लावा…झाडे जगवा…उपक्रम राबविणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम आम्ही पत्रकार संघाच्या वतीने राबविले आहेत.
बरेच दिवस आम्ही दोघेही वेगवेगळ्या वर्तपत्रात काम करीत होतो.काम करीत असताना कडू गोड अनुभव आम्ही अनुभवले आणि एकदाचे ठरवले आपले स्वतःचे वृत्तपत्र आपण चालू करू…आम्ही दोघांनी शासनाच्या नियमानुसार सर्वच बाबी पूर्ण करून दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा वृत्तपत्र चालू केले.दोन्ही वृतपत्रांनी गरुड झेप घेतली आहे.ही वृत्तपत्रे अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहेत.आज दादांचा संघर्षमय जीवन प्रवास…आनंदमय झाला आहे.दादा आज यशोशिखरावर पोहोचले आहेत.दुधात साखर पडावी अगदी तसेच दादा पुरोगामी पत्रकार संघात नांदेड जिल्हा अध्यक्ष होते ते आता मराठवाडा अध्यक्ष झाले आहेत.दादांचा दि.०३ मार्च हा जन्मदिवस आहे,हा जन्मदिवस आम्ही मित्रपरिवार लोकोपयोगी उपक्रमांने मोठ्या उत्साहाने साजरा करतोत.त्या निमित्ताने दादांना आभाळभर,मंगलमय,हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
दादांना पुन्हा एकदा भावी उज्वल यशस्वी वाटचालीसाठी माझ्या व माझ्या परिवाराकडून अगदी मनापासून आभाळभर शुभेच्छा…!
“कळत न कळत शब्द बाहेर पडतात… बस…दादा ठाकूर नाम काफी है…!”
-: शब्दांकन :-
मारोती शिकारे,नांदेड
मुख्य संपादक- सा.नंदगिरीचा कानोसा
मो.नं.८९७५७३०८१८