राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत कु.सलोनी सुरदसे ने प्राप्त केली प्रथम क्रमांकाची विजयश्री

नांदेड जिल्ह्यातील चार खेळाडू मुलींचा आहे विजयश्रीत समावेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा-२०२५ संपन्न झाली असून या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील चार खेळाडू मुलींनी विजयश्री प्राप्त केली आहे.यात क्रीडा प्रशिक्षक तथा पंच बालाजी गाडेकर यांची शिष्या कु.सलोनी विनोद सुरदसे हिने १८ वर्षांवरील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजयश्री प्राप्त केली असून उपरोक्त दांडपट्टा खेळाडू व प्रशिक्षक यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.दांडपट्टा स्पोर्टस असोशिएशन महाराष्ट्र,दांडपट्टा स्पोर्टस असोसिएशन इंडिया,दांडपट्टा स्पोर्टस एशियन कौन्सिल, इंटरनॅशनल दांडपट्टा स्पोर्टस कौन्सिल,मार्शल आर्टस गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हापूर,महाराष्ट्र राज्य येथे पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा-२०२५ संपन्न झाली.सदरील स्पर्धेत राज्यातील १४ जिल्ह्यातील वयोगट १८ वर्षांवरील व १८,१४,१२ वर्षांखालील एकूण ४१० खेळाडू मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता.यात नांदेड जिल्ह्यातील ४ खेळाडू मुलींनी विजयश्री प्राप्त केली आहे.यातील वयोगट १८ वर्षांवरील मुलींच्या स्पर्धेत कु. सलोनी विनोद सुरदसे हिने प्रथम क्रमांकाच्या पदकाची विजयश्री प्राप्त केली आहे.तर १८ वर्षांखालील मुलीत कु.वैष्णवी नामदेव येळगे ने तृतीय क्रमांक,१४ वर्षांखालील मुलीत कु.प्रगती राष्ट्रपाल इंगोले ने तृतीय क्रमांक व १२ वर्षांखालील मुलीत कु.समिक्षा किरण बोईनवाड ने तृतीय क्रमांकाच्या पदकाची विजयश्री प्राप्त केली आहे.
दांडपट्टा स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप लाड, सचिव बाला साठे,खजिनदार गौतम विधाते,सहसचिव अजय शहा, सहखजिनदार महमद रफी शेख,जेष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे,शस्त्र व शास्त्र विशारद आणि लेखक वस्ताद विनायक चोपदार (आबाजी),वस्ताद मनोज बालिंगेकर.दांडपट्टा महाराष्ट्राच्या सदस्या सौ.दिपाली साठे,महागुरु सुभाष मोहिते,दांडपट्टा इंडियाचे अध्यक्ष संभाजी अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असून यावेळी क्रीडा प्रशिक्षक तथा पंच बालाजी गाडेकर यांसह नांदेड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आणि क्रीडा प्रेमींची उपस्थिती होती.