सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे-जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे

अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुदखेड : सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेची गाव तीथे शाखा उभारण्यासाठी तरुणानी चळवळीत सहभागी झाले पाहिजे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांनी मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहातील बैठकीत केले आहे.
मुदखेड येथे डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने दि.३० मार्च २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची एक महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर,जिल्हा सचिव चंद्रकांत बाबळे,जेष्ठ कार्यकर्ते कामाजी वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष हातागळे.जिल्हा उपाध्यक्षा द्रोपताताई कांबळे,लोहा तालुकाध्यक्ष मल्हारी गायकवाड,आनदा सुर्यवंशी मुदखेड तालुका अध्यक्ष भुजंग गायकवाड,परमेश्वर कलवले,धाराजी वाघमारे यांसह आदींची उपस्थिती होती. संपन्न झालेल्या बैठकीत संजय वाघमारे बोरीकर,चंद्रकांत बाबळे, कामाजी वाघमारे यांसह आदींनी मार्गदर्शन केले.तर पुढे बोलताना पंडित वाघमारे म्हणाले की,डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे महाराष्ट्रातील उपेक्षित माणसांच्या न्यायाचे आंदोलन करत आहेत.या आंदोलनास बळ म्हणून डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेची गाव तिथे शाखा उभारुन तरुणांनी या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी झालेच पाहिजे.
सदरील बैठक यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर सोनटक्के, विश्वजीत बारडकर,कॄष्णा रणखांबे,शिवा रणखांबे,ओमकार गायकवाड, बालाजी गायकवाड,पुंडलिक सुर्यवंशी,बाळु भालेराव यांसह आदींनी परिश्रम घेतले.