Thu. Dec 19th, 2024

‘श्री शाहू’स ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ चे विभागीय तिसरे बक्षीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

Spread the love

संस्थेने टाकलेल्या विश्वासास पात्र होण्यासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार-प्राचार्य संजय देशमुख

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,भोकर ही शाळा आपल्या सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीसाठी सुविख्यात आहेच.पण सहशालेय उपक्रमात ही शाहूने केलेल्या कर्तबगारीचा ठसा चक्क विभागीय पातळीवर उमटला असून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात श्री शाहूला विभागातून तिसरे पारितोषिक जाहीर झाले.आणि दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व मुख्य सचिव यांच्या हस्ते ‘श्री शाहू-परिवारा’ ला हे बक्षीस भव्य दिव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आले असून सदरील यशाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

तेलंगणा राज्य सिमेवरील महाराष्ट्रातील भोकर सारख्या ठिकाणी कै.आ.बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.कै.माजी आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या काळात या संस्थेने उत्तरोत्तर प्रगती केली.तेव्हा पासून श्री शाहूने कधीच मागं वळून पाहिलं नाही.शैक्षणिक, सहशैक्षणिक,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य उज्वल यशाचे उच्चांक शाहूने आपल्या नावावर नोंदवले आहेत. राज्यात घेण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेत नुकतेच श्री शाहू ने विभागातून ११ लाख रुपयांच्या बक्षिसांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.सदरील बक्षिस वितरणाचा भव्य दिव्य सोहळा दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई मध्ये संपन्न झाला आहे.या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री दिपक केसरकर,मुख्य सचिव यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शाहूचे सचिव शिरिष भाऊ देशमुख गोरठेकर, प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर व श्री शाहू परिवार टिमला सदरील बक्षिस प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.

श्री शाहूच्या या यशात शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव शिरिष भाऊ देशमुख गोरठेकर,संचालक कैलासभाऊ देशमुख गोरठेकर,शिक्षण उपसंचालक मोरे साहेब,शिक्षण सहसंचालक डॉ.दत्तात्रय मठपती,शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (प्रा)सविता बिरगे,उपशिक्षणाधिकारी पाचंगे, उपशिक्षणाधिकारी बनसोडे,विस्तार अधिकारी बसवदे,गट शिक्षणाधिकारी गुट्टे,विस्तार अधिकारी श्रीमती गोणारकर आदींनी प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर व शाहू परिवाराचे अभिनंदन केले आहे.

संस्थेने टाकलेल्या विश्वासास पात्र होण्यासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार-प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर 

उपरोक्त यशाबद्दल प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांचे संपादक उत्तम बाबळे यांनी मनस्वी हार्दिक अभिनंदन करुन संवाद साधला असता त्यांनी संस्थेने टाकलेल्या विश्वासास पात्र होण्यासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार व यापुढे लोकसहभागातून राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे! असा निर्धार व्यक्त केला आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !