Fri. Dec 20th, 2024

भोकर येथील श्री नृसिंह पेट्रोलियमचा नुतन उपक्रम-लवकरच सी.एन.जी.पंपाच्या होतोय शुभारंभ!

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तेलंगणा राज्य सिमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील भोकर शहरात उद्योजक डॉ.बालाजी बाबूराव पाटील आंदबोरीकर यांनी त्यांच्या श्री नृसिंह पेट्रोलियम येथे वाहनधारकांच्या सेवेसाठी पेट्रोल,डिझेलसह आता सी.एन.जी. उपलब्ध करुन देण्यासाठी सी.एन.जी.पंप उभारला असून या पंपाचा शुभारंभ लवकरच होणार आहे.
भोकर येथील श्री नृसिंह पेट्रोलियमने वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल ची विश्वसनीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.असे असतांना दिवसेंदिवस वाढत असलेल्या सी.एन.जी.वाहनांची संख्या व त्यांना लागणारी इंधनसेवा विचारात घेवून उद्योजक डॉ. बालाजी बाबूराव पाटील आंदबोरीकर यांनी याच ठिकाणी सी.एन.जी. गॅस पंप उभारला आहे.तेलंगणा राज्यातून ये – जा करणारी असंख्य वाहने श्री नृसिंह पेट्रोलियम पासूनच जातात. तसेच उमरी,मुदखेड, हिमायतनगर व हदगाव तालुक्याच्या मध्यवर्ती स्थानी भोकर येथे हा नृसिंह पेट्रोल पंप असून जवळपास अन्य एकही सी.एन.जी.पंप उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना हा पंप अतिशय सोयीचा ठरणार आहे.एम.एन. जी.एल.कंपनीच्या सी.एन.जी.गॅस पुरवठ्याचा या पंप उभारणीचे काम पुर्णत्वास आले असून लवकरच काही मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ होणार आहे.भोकर शहरात सी.एन.जी.गॅस पुरवठा होणार असल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !